Crime News AI-generated image
राष्ट्रीय

Crime news: तरूणाच मुंडक तोडलं, गुप्तांग कापलं...; झुडपांमध्ये आढळला छिन्नविछिन्न मृतदेह, भोपाळ हादरले

भोपाळमध्ये एका अज्ञात तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाचे शीर धडावेगळे केले असून त्याचे गुप्तांगही छाटल्याची भयानक बाब समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bhopal crime news

भोपाळ: भोपाळमधील गोविंदपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'भेल' गेट क्रमांक ८ जवळील झुडपांमध्ये एका अज्ञात तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी या तरुणाचे शीर धडावेगळे केले असून त्याचे गुप्तांगही छाटल्याची भयानक बाब समोर आली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून गोविंदपुरा पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अद्याप मृतकाची ओळख पटू शकलेली नाही.

सीसीटीव्ही आणि स्केचच्या आधारे तपास

मृत व्यक्तिची ओळख पटवण्यासाठी पोलीस आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची माहिती घेत आहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. हा घातपात कधी घडला आणि मृतदेह कधी झुडपात आणून टाकला, याचा तपास लावण्यासाठी प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे.

भोपाळचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल शर्मा यांनी सांगितले की, "आज सकाळी ८ च्या सुमारास शीर आणि गुप्तांग छाटलेला एक मृतदेह आढळून आला आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. मृतकाचे स्केच तयार करून सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिकदृष्ट्या हा हत्येचाच प्रकार दिसत आहे."

पोस्टमार्टन अहवाल आणि मृतकाची ओळख पटल्यानंतरच या निर्घृण हत्येमागचे खरे कारण आणि आरोपींचा शोध घेता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT