bengaluru live in partner murder file photo
राष्ट्रीय

Crime News: प्रेमाचा भयंकर शेवट! प्रेयसीचा गळा आवळला अन् फॅनला लटकवलं; बंगळूर हादरलं! नेमकं असं काय घडलं?

bengaluru live in partner murder: एका २३ वर्षीय तरुणीचा तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

bengaluru live in partner murder

बंगळूर: एका २३ वर्षीय तरुणीचा तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना बंगळूर येथील सरजापूर रोडवरील रामदास लेआउटमध्ये घडली. आरोपीने खूनानंतर आत्महत्येचा बनाव रचला होता, मात्र पोलिसांच्या तपासापुढे त्याचे पितळ उघडे पडले.

रंजिता एच.जी. असे मृत तरुणीचे नाव असून, पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर अय्यप्पा के.बी. याला अटक केली आहे. हे दोघेही मूळचे कोडागू जिल्ह्यातील असून बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. अय्यप्पा एका सुकामेवा विक्रीच्या दुकानात काम करत होता, तर रंजिता घरकाम करत होती.

रंजिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, रंजिता आणि अय्यप्पा यांचे एकमेकांवर प्रेम होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रंजिताने अय्यप्पाची आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली होती आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी अय्यप्पाने आपले पहिले लग्न झाले असून पत्नीशी वाद असल्याने आपण वेगळे राहत असल्याचे सांगितले होते. घटस्फोट मिळाल्यानंतर रंजिताशी लग्न करण्याचे आश्वासन त्याने कुटुंबाला दिले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. अय्यप्पा क्षुल्लक कारणावरून तिला मारहाण करत असे. "तो घरी मित्रांसोबत पार्ट्या करायचा आणि माझा छळ करायचा," अशी तक्रार रंजिताने मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वी आपल्या आईकडे केली होती. १ मार्च रोजी त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर मारहाण केली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.

१२ मार्च रोजी पहाटे अय्यप्पाने रंजिताच्या बहिणीला फोन करून रंजिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तिला तातडीने सरजापूर रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रंजिताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

आरोपीने प्रथम एका वायरने रंजिताचा गळा आवळून तिला ठार मारले. गुन्हा लपवण्यासाठी त्याने छताच्या पंख्याला दोरी बांधून तिला लटकवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ती आत्महत्या वाटेल. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT