Bengaluru engineer kills wife File Photo
राष्ट्रीय

Bengaluru engineer kills wife: एक मेसेज, दोन मृत्यू! पत्नीचे उशीने तोंड दाबले, मग आईला मेसेज अन्... बेंगळूर हादरले!

कौटुंबिक वादातून एका सिव्हिल इंजिनिअरने आपल्या पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर आईला मेसेज पाठवून स्वतःही गळफास घेत जीवन संपवले.

मोहन कारंडे

Bengaluru engineer kills wife

बेंगळूर: कौटुंबिक वादातून एका सिव्हिल इंजिनिअरने आपल्या पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर आईला मेसेज पाठवून स्वतःही गळफास घेत जीवन संपवले. शनिवारी बेंगळूरमध्ये ही घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सुमंत (वय ३२) आणि पद्मावती (वय २९) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सुमंत हा मूळचा दक्षिण कन्नड येथील असून तो सिव्हिल इंजिनिअर होता, तर त्याची पत्नी पद्मावती ही हुबळी येथील असून एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य हेग्गनाहल्ली येथील राजेश्वरी नगर भागात राहत होते. बुधवारी दोघांमध्ये अचानक जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर नंतर हिंसाचारात झाले. रागाच्या भरात सुमंतने पद्मावतीला बेदम मारहाण केली आणि उशीने तिचे तोंड दाबले. यातच श्वास गुदमरून पद्मावतीचा मृत्यू झाला.

पत्नीचा श्वास थांबल्याचे लक्षात आल्यावर हादरलेल्या सुमंतने तत्काळ आपल्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने 'मीसुद्धा जीव देत आहे' असा मेसेज आईला पाठवला. मेसेज पाहताच आईने तातडीने घरमालकाशी संपर्क साधून माहिती दिली. घरमालकाने घरात जाऊन पाहिले असता, सुमंतचा मृतदेह हॉलमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पद्मावतीचा मृतदेह आतल्या खोलीत पडलेला होता.

घटनेची माहिती मिळताच राजागोपाल नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मृतदेह व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पद्मावती यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचा पुढील घटनाक्रम शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT