Crime News: पतीला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग प्रायव्हेट पार्टला विजेचा शॉक दिला अन्...; पत्नीचा भयंकर कारनामा उघडकीस

अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह आणि पतीकडून खर्चासाठी पैसे मिळत नसल्याच्या रागातून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Crime News
Crime NewsAI Photo
Published on
Updated on

Delhi crime news

नवी दिल्ली: अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह आणि खर्चासाठी पती पैसे देत नसल्याच्या रागातून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. दक्षिण दिल्लीतील रतिया मार्ग येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्येनंतर हा प्रकार दरोड्याचा भासवायचा प्रयत्न केला गेला, परंतु पोलिसांच्या तपासापुढे पत्नीची चलाखी निष्फळ ठरली. याप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

मुन्ना लाल (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी मंजू (वय ४५), तिचा प्रियकर चमन (वय २०) आणि त्यांना मदत करणारा साथीदार किशन यांना अटक केली आहे.

१० ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिल्डर असलेल्या मुन्ना लालचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह राहत्या घरात आढळून आला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते, कपाटाचे ड्रॉवर उघडे होते. मुन्ना लाल याची पत्नी पत्नी मंजू हिने पोलिसांना सांगितले की, चोरट्यांनी गच्चीवरून घरात घुसून पतीची हत्या केली. मुन्ना लाल यांना तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Crime News
Crime News: १६ वर्षीय मुलीला मुंबईत १ लाखात विकले, जबरदस्तीने लग्न आणि शारीरिक छळ; ६ वर्षांनंतर तस्करांच्या तावडीतून सुटका

घटना उघडकीस कशी आली?

घटनास्थळाची पाहणी करताना फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. तपासात असे दिसून आले की, मुन्ना लाल यांना प्रथम गुंगीचे औषध देण्यात आले होते, त्यानंतर गळा आवळून आणि डोक्यावर-चेहऱ्यावर बोथट शस्त्राने वार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गुप्तांगाला विजेचे धक्के देण्यात आले होते. घरातील साहित्य मुद्दाम अस्ताव्यस्त टाकल्यासारखे वाटत होते. जमिनीवर काही ठिकाणी रक्त पुसल्याचे डाग होते.

त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शेजारच्या गल्ल्यांमधील सीसीटीव्ही फुटेजमधून आणखी एक धागा सापडला. तोंडाला रुमाल बांधलेल्या एका व्यक्तीने रात्री १.४५ च्या सुमारास घरात प्रवेश केला आणि ३.१५ वाजता बाहेर पडल्याचे दिसले. याच दरम्यान मंजू आणि तिच्या साथीदाराच्या संशयास्पद हालचालीही कॅमेऱ्यात कैद झाल्या.

प्रियकराला दिली ५ लाखांची सुपारी

विशेष पथकाने मंजूची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मंजूचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या चमन (वय २०) नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. मुन्ना लाल तिला खर्चासाठी पैसे देत नसल्याने ती त्रस्त होती. पतीचा काटा काढण्यासाठी मंजूने चमनला ५ लाख रुपये आणि भविष्यात आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले होते. हत्येनंतर दोघांनी एकत्र राहण्याचे नियोजन केले होते.

९ ऑगस्टच्या रात्री मंजूने चमनने आणून दिलेल्या झोपेच्या गोळ्या पतीच्या जेवणात मिसळल्या. मुन्ना लाल बेशुद्ध झाल्यावर दोघांनी त्यांच्या गुप्तांगाला विजेच्या उघड्या तारा लावून शॉक दिले. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्यावर वार करून गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मंजूने चमनला २०,००० रुपये रोख दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी लाल यांची हत्या केली आहे, अशी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या दोघांनी घरभर सामान पसरवले.

तिघांना अटक

या हत्येचा तपास करण्यासाठी संयुक्त पोलीस आयुक्त विजय कुमार आणि पोलीस उपायुक्त अनंत मित्तल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी मंजू आणि चमन याच्यासह त्यांना मदत करणाऱ्या किशन या तिसऱ्या साथीदारालाही अटक केली आहे.

Crime News
Shocking Crime News: कूकरने शिक्षक पत्नीचं डोकं फोडलं.. टबमध्ये बुडवलं त्यानंतर मृतदेहाजवळ ढसाढसा रडला; हे कसलं प्रेम?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news