"उतरा, मी पुढे जाणार नाही!" १०० मीटर चालण्यावरून कॅबमध्ये वाकयुद्ध, महिलेच्या चुकांवर ड्रायव्हर भडकला.. File Photo
राष्ट्रीय

"उतरा, मी पुढे जाणार नाही!" १०० मीटर चालण्यावरून कॅबमध्ये वाकयुद्ध, महिलेच्या चुकांवर ड्रायव्हर भडकला..

पण या प्रकरणात नेमकी चूक कोणाची होती हे जाणून घ्या...

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन :

Bengaluru Cab Driver vs Woman Passenger: बेंगळुरूमध्ये कॅब ड्रॉप लोकेशनवरून एका कॅब ड्रायव्हर आणि महिला प्रवासी यांच्यात झालेल्या तीव्र वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्रायव्हरचा दावा आहे की महिलेमुळे त्याला 15 मिनिटे थांबावे लागले, तर महिलेचा आरोप आहे की ड्रायव्हरने तिच्याशी गैरवर्तन केले. 100 मीटरच्या या वादामागची काय आहे कारण जाणून घ्या..

डिजिटल युगात कॅब बुक करणे जितके सोपे आहे, तितकाच कधी कधी प्रवासाच्या शेवटी अनुभव कडूही ठरू शकतो. बेंगळुरूमध्ये असाच एक प्रसंग पुन्हा समोर आला आहे, जिथे महिला प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यातील ‘तू-तू मैं-मैं’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. वाद ना भाड्याचा होता, ना मार्गाचा या दोघांमध्ये भांडण केवळ ‘100 मीटर’ अंतर आणि बोलण्याच्या पद्धतीवरून झाले. या व्हायरल व्हिडिओमुळे कामगारांवरील ताण आणि ग्राहकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

व्हिडिओची सुरुवात तणावपूर्ण वातावरणात होते. अ‍ॅप-आधारित कॅब ड्रायव्हर महिला प्रवाशाला वारंवार म्हणताना दिसतो, “आपली लोकेशन तपासा.” ड्रायव्हरचे म्हणणे आहे की, तो तिला ड्रॉप लोकेशनपासून 100 मीटर पुढे किंवा मागे सोडू शकत नाही. ड्रायव्हरने मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केल्यावर वाद आणखी वाढतो. व्हिडिओमध्ये ड्रायव्हर म्हणतो, “मी किती वेळ वाट पाहू? तुम्ही लोकेशन नीट का ठरवली नाही?”

महिलेने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला. महिलेचा आरोप आहे की, ड्रायव्हर तिच्यावर ओरडत होता, त्यामुळे तिने स्वतःच्या बचावासाठी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. यावर ड्रायव्हर प्रत्युत्तर देत म्हणतो, “तुम्ही हा व्हिडिओ नॉनसेन्ससाठी बनवत आहात.”

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडिओ एका युजरने शेअर केला आहे. पोस्टनुसार, नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की योग्य लोकेशन न मिळाल्याने ड्रायव्हर गेल्या 10–15 मिनिटांपासून गाडी फिरवत होता. ड्रायव्हरचा दावा आहे की महिलेला स्वतःची अचूक लोकेशन माहीत नव्हती. ड्रायव्हरने पुढे सांगितले की, त्याची पुढील बुकिंग असल्याने तो आता मागे जाऊ शकत नाही. त्यावर महिलेने कथितरित्या त्याला शिवीगाळ केली आणि ‘नॉनसेन्स’ असे म्हटले. या वादात एक क्षण असा आला की,पॅसेंजर महिला आणि कॅब चालक या दोघांमध्ये भाषेची भिंत उभी राहिली. अहवालानुसार, वादाच्या दरम्यान ड्रायव्हरने महिलेला कन्नड भाषेत बोलण्यासही सांगितले.

यावर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या..

हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडिया युजर्स दोन गटांत विभागले गेले. अनेकांचे मत आहे की GPS नेहमी 100% अचूक नसतो. एका युजरने लिहिले, “अंतर फक्त 50–100 मीटर असेल, तर चालत जाता येते. चूक महिलेची वाटते. विनंती केली तर ड्रायव्हर सोडतात, पण बोलण्याची पद्धत महत्त्वाची असते.”

तर काहींनी मधला मार्ग सुचवला. एका अन्य युजरने लिहिले, “ही अहंकाराची लढाई आहे. कुणाकडे जड सामान नसेल, तर 100 मीटरसाठी भांडणे मूर्खपणाचे आहे. कन्नड लोक समजूतदार असतात; प्रेमाने बोलले असते, तर कदाचित अशी वेळ आली नसती.”

ही घटना केवळ एका कॅब राईडचा वाद नाही. आपल्या महानगरांतील वाढता तणाव आणि कमी होत चाललेला संयम यांचे हे प्रतीक आहे. एका बाजूला पुढील राईड वेळेत गाठण्याचा दबाव असलेला ड्रायव्हर आहे, तर दुसऱ्या बाजूला पैसे देऊन सुविधा अपेक्षित मिळावी अशी अपेक्षा करणारा ग्राहक आहे.

प्रश्न असा आहे की तंत्रज्ञानावर (GPS) आपली अवलंबन इतकी वाढली आहे का, की 100 मीटरसाठी मानवी संवेदनांकडे आपण दुर्लक्ष करतो? चूक कुणाचीही असो, थोडीशी नम्रता असती, तर हा प्रवास पोलीस ठाणे किंवा सोशल मीडियापर्यंत पोहोचला नसता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT