Chhattisgarh Bastar News : छत्तीसगडचा बस्‍तर जिल्‍हा झाला नक्षलमुक्‍त, केंद्र सरकारने केली घोषणा  File Photo
राष्ट्रीय

Chhattisgarh Bastar News : छत्तीसगडचा बस्‍तर जिल्‍हा झाला नक्षलमुक्‍त, केंद्र सरकारने केली घोषणा

छत्तीसगडमधील बस्तर हा तोच भाग आहे जो १९८० पासून नक्षल्यांचा बालेकिल्ला मानला जात होता.

पुढारी वृत्तसेवा

Bastar district of Chhattisgarh has become Naxal-free, the central government announced

बस्‍तर : पुढारी ऑनलाईन

एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेला बस्तर आता लाल दहशतीच्या सर्व खुणा पुसून टाकण्यात आल्‍या आहेत. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याबाबत एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. छत्तीसगडचे बस्तर आता नक्षलमुक्त झाले आहे.

केंद्र सरकारने बस्तरला डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी जिल्ह्यांच्या यादीतून वगळले आहे. छत्तीसगडमधील बस्तर हा तोच भाग आहे जो 1980 पासून नक्षलवाद्यांचा गड मानला जात होता. जिथे पाय ठेवणे देखील सुरक्षा दलांसाठी धोकादायक होते.

बस्तर हे अबूझमाड आणि ओडिशाच्या सीमेला लागून आहे. हे गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादी कारवायांचे केंद्र आहे. पण आता हा परिसर पूर्णपणे नक्षलवाद्यांपासून मुक्त झाला आहे. केंद्र सरकारने बस्तरला दिलेली विशेष केंद्रीय मदतही सरकारने आता थांबवली आहे.

बस्‍तर असा जिल्‍हा होता की जिथे अबुझमाड आणि ओडिशाची मोठी सीमा होती. येथील डोंगर टेकड्यांवर नक्‍शलींचा ताबा होता. या ठिकाणी सुरक्षा दलांना पोहोचणे २ वर्षांपूर्वी अवघड होते. आता या ठिकाणी सुरक्षा दलांचे कँप उघडण्यात आले आहेत. त्‍यामुळे हा परिसर आता पुर्णपणे नक्षलमुक्‍त झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT