Bangladesh Take Over pudhari
राष्ट्रीय

Bangladesh Take Over: आता खूप झालं! आम्ही १६ डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेऊ... भाजप मंत्र्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

Bangladesh Take Over: पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री अर्जुन सिंह यांनी एक मोठं अन् वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Anirudha Sankpal

Bangladesh Take Over: बांगलादेशात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. त्यातच माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपण १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बांगलादेशमधील परिस्थिती अजूनच नाजूक झाली आहे. त्यातच आता पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री अर्जुन सिंह यांनी एक मोठं अन् वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी १६ डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेणार असं वक्तव्य केलं आहे. अर्जुन सिंह बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या हत्याचा बदला घेण्याचा दावा देखील करत आहेत.

आता खूप झालं...

मंगळवारी काकिनोरा येथील गंगा आरतीनंतर पत्रकारांशी बोलताना अर्जुन सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी, 'आम्ही १६ डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेणार आहोत. आता खूप झालं आहे. बांगलादेश प्रकरणात आता कोणती सबब चालणार नाही. बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंदूंची हत्या होत आहे आम्ही त्याचा जरूर बदला घेऊन यात कोणतीही शंका नाही.'

अर्जुन सिंह यांच्या या वक्तव्याच्या टायमिंगची चर्चा सुरू आहे. सध्या बांगलादेशात तनाव निर्माण झाला आहे. बांगलादेशचे परराष्ट्र राज्य मंत्री यापूर्वीच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशत परतण्याची परवानगी जर त्या कैद्याच्या रूपात येणार असतील तरच मिळार असं सांगितलं आहे.

बांगलादेशात तणाव

मंगळवारी बांगलादेशात खिलाफत मजलीस चे प्रमुख मैलाना मामूनुल हक यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी कैदी अदला बदली कराराअंतर्गत शेख हसीना यांना भारतातून परत आणलं जावे. त्यांनी आवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते करत असलेल्या हिंसाचार आणि जाळपोळ, हत्या याद्वारे बांगलादेश अस्थीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

अपराध्याप्रमाणे शिक्षा भोगावी

२४ नोव्हेंबरला ढाका येथील एका रॅलीला संबोधित करत असताना मामूनुल यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या एका न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे त्यांना परत आणलं गेलं पाहिते. त्यांनी एका अपराध्याप्रमाणे शिक्षा भोगावी.'

मामूनुल यांचा आरोप आहे की या घडीला भारतात राहणाऱ्या आवामी लीगच्या सदस्यांनी बांगलादेश अस्थीर करण्याचा कट रचला आहे. त्यांनी जाळपोळ, हत्या आणि इतर हिंसक घटनांमध्ये आवामी लीगचे नेते सामील असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लीगच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गेल्या १५ वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला देखील सोडता कामा नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT