California Burrito founder Bert Mueller
बंगळूर : भारतात व्यवसाय करणे खूप आव्हानात्मक आहे, असे अनेकांचा समज आहे. पण, भारतात कॅलिफोर्निया बुरिटो नावाचे मेक्सिकन फूड रेस्टॉरंट्स चेन चालवणारे बर्ट म्यूलर यांनी भारतात व्यवसाय करणे ही एक संधी म्हणून पाहिले आणि त्यात त्यांनी यश मिळवले.
३५ वर्षीय बर्ट म्यूलर २०११ मध्ये अमेरिकेतून भारतात आले आणि त्यांनी एका वर्षानंतर आपले पहिले स्टोअर खुले केले. आज भारतात त्यांची १०३ स्टोअर्स आहेत. गेल्या वर्षा त्यांच्या व्यवसायाची उलाढाल २.३ कोटी डॉलर (सुमारे १९५ कोटी) रुपयांवर पोहोचली. २०३० पर्यंत ३०० स्टोअर खुले करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे आणि त्यांची कंपनी त्यांचा स्वतःचा आयपीओ बाजारात आणण्याचा विचार करत आहे.
त्यांच्या १०० व्या स्टोअरसाठी बुरिटो चेन रेस्टॉरंटने त्यांच्या मेन्यूवरील प्रत्येक पदार्थाची किंमत १०० रुपये ठेवली होती. ही ऑफर खूप व्हायरल झाली, असे बर्ट म्यूलर सांगतात.
म्यूलर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी २०१२ मध्ये कॅलिफोर्निया बुरिटो सुरू केले. ते भारतात स्टडी टूरसाठी आले असताना त्यांना ही कल्पना सुचली. त्याच्या एका मेक्सिकोच्या वर्गमित्राने मेक्सिकन जेवण मागवले आणि त्यांना ते खूप आवडले. "तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी सूचलं की हे मी कदाचित करू शकतो. मी भारतात मेक्सिकनची पाककृती आणू शकतो," असे म्यूलर म्हणाले.
आज कॅलिफोर्निया बुरिटोची १०० हून अधिक ठिकाणी स्टोअर्स आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या व्यवसायाची उलाढाल २.३ कोटी डॉलर्सवर पोहोचली. पण या व्यवसायाच्या या प्रवासात काही त्रुटी राहिल्याचे ते सांगतात. मी कधीही मार्केटिंगवर पैसे खर्च केले नाहीत. १०० वे स्टोअर्स खुले करण्याचे सेलिब्रेशन जसे झाले तसे सुरुवातीलाच काहीच केले नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.
"मार्केटिंगवर आम्ही कमी खर्च केला आणि कोरोनापर्यंत त्यावर आम्ही काहीच खर्च केला नव्हता," असे म्यूलर म्हणतात. म्यूलर यांनी अंदाज बांधला होता की त्याचे पहिले स्टोअर खुले करण्यासाठी १ लाख अमेरिकन डॉलर्स खर्च येईल. त्यासाठी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांकडून अडीच लाख डॉलर्स गोळा केले. त्यावेळी त्यांचे मित्र, कुटुंबियांना सांगितले होते की काळजी घे, यात जोखीम आहे. पण त्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर कॅलिफोर्निया बुरिटोची सुरुवात केली.
त्याच्या १०० व्या स्टोअरच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने म्यूलर यांनी प्रसिद्धीसाठी प्रभावशाली लोकांना नियुक्त केले. त्या दिवशी कॅलिफोर्निया बुरिटोने त्याच्या रोजच्या व्यवसायापेक्षा आठ पट गल्ला जमवला.
बर्ट म्यूलर बंगळूरमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मते, भारत हा असा देश आहे जिथे कसलाही अंदाज लावता येत नाही. येथे प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि हीच भारताची खासीयत आहे.
बर्ट बंगळूर येथील एका अपार्टमेंट राहतात. त्यांच्या अपार्टमेंटमधील फर्निचर हे त्यांच्या आजी-आजोबांचे आहे. यामुळे हे घर आपल्याला अमेरिकेसारखे वाटते. जर तुम्हाला भारतात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल. अमेरिकेत जे काम सोपे आहे येथे त्याला वेळ लागतो. पण हेच भारताचे सौंदर्य आहे, असे ते सांगतात.