Bangalore two girls auto driver fight viral video File Photo
राष्ट्रीय

Girls auto driver fight viral video: भाडं देण्यावरून वाद; रस्त्यावर दोन तरुणी आणि रिक्षाचालकात तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून दोन तरुणी आणि रिक्षाचालकामध्ये रस्त्यावरच हाणामारी झाल्याचा प्रकार बंगळूरमधील एचएसआर लेआउट सेक्टर-३ परिसरात सोमवारी दुपारी घडला.

पुढारी वृत्तसेवा

Bangalore two girls auto driver fight viral video

बंगळूर : रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून दोन तरुणी आणि रिक्षाचालकामध्ये रस्त्यावरच हाणामारी झाल्याचा प्रकार बंगळूरमधील एचएसआर लेआउट सेक्टर-३ परिसरात सोमवारी दुपारी घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

नागरिकांनी मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुणी आणि रिक्षाचालक एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर, आणखी एका तरुणीने मध्यस्थी करून हे भांडण सोडवले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर एचएसआर लेआउट पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे संबंधित तरुणींशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पोलिस ठाण्यात येण्यास नकार देत एक-दोन दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी रिक्षाचालकाचाही शोध घेतला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणींनी त्याची रिक्षा भाड्याने घेतली होती. प्रवासाचे भाडे देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. रिक्षाचालकाने पोलिसांकडे केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्यांनी त्याला शिवीगाळ केली आणि भाडे देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणींनीच प्रथम त्याच्यावर हात उचलल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याला प्रत्युत्तर देताना त्यानेही त्यांना मारहाण केल्याचा दावा त्याने केला.

दरम्यान, “तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT