Mallikarjun Kharge Warrant Issued pudhari
राष्ट्रीय

Mallikarjun Kharge Warrant Issued: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंविरूद्ध वॉरंट जारी.... बजरंग दलाची PFI शी केली होती तुलना

Anirudha Sankpal

Mallikarjun Kharge Warrant Issued: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरूद्ध पंजाबमधील संगरूर न्यायालयात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार खरगे यांना स्वतः कोर्टात हजर होऊन जामीन घ्यावा लागणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण २०२३ चे आहे. संगरूरचे रहिवासी आणि बजरंग दलाशी निगडीत असलेल्या हितेश भारद्वाद यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. यात बजरंग दलाची तुलना ही पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाशी (PFI) करण्यात आली आणि काँग्रेस सरकार स्थापन होताच बजरंग दलावर प्रतिबंध घालण्यात यावा असे वक्तव्य केले होते.

कोर्ट काय म्हणतंय?

या प्रकरणी कोर्टाने मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरूद्ध १५ हजार रूपये जामीन वॉरंट जारी केला आहे. सुरूवातीला हे प्रकरण दिवानी असल्याचं मानलं गेलं. मात्र आता कोर्टाने हे प्रकरण फौजदारी प्रकारचं असल्याचं मानत कारवाई सुरू केली आहे.

कोर्टाने स्पष्ट केलं की जर मल्लिकार्जुन खरगे हे पुढच्या सुनावणी १९ सप्टेंबर रोजी वैयक्तिकरित्या उपस्थित रहात नाहीत तर त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT