Mallikarjun Kharge : खर्गे पिता-पुत्रांच्या ट्रस्टला सरकारी जमीन

भाजपचा आरोप; जमीन १०० कोटींची असल्याचा दावा
Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे File Photo
Published on
Updated on

बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांचे पुत्र तसेच कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर भ्रष्टाचार आणि सरकारी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. खर्गे कुटुंबाच्या ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’च्या माध्यमातून कर्नाटकातील सरकारी मालकीची १०० कोटींहून अधिक रुपयांची जमीन बेकायदेशीररीत्या बळकावण्यात आली आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी बुधवारी केला.

दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना, भंडारी म्हणाले, नियमांचे उल्लंघन करून कर्नाटकातील १०० कोटी रुपयांची सरकारी जमीन मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबाच्या खाजगी ट्रस्टला देण्यात आलीआहे. ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’मध्ये केवळ खर्गे कुटुंबाचे सदस्य आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, त्यांचे पुत्र प्रियांक खर्गे, खर्गे यांचे जावई आणि त्यांची पत्नी हे सिद्धार्थ विहार ट्रस्टचे सदस्य आहेत. खर्गे कुटुंबाने कर्नाटकाच्या विविध भागांतील गरिबांची जमीन लुटण्यासाठी आपल्या राजकीय प्रभावाचा आणि सत्तेचा गैरवापर केला आहे.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना २०२४ मध्ये कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (केआयडीबी) 'एरोस्पेस अँड डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट' या नावाने सिद्धार्थ विहार ट्रस्टला ५ एकर जमीन दिली होती. औद्योगिक वापरासाठी असलेली ही जमीन खर्गे यांच्या खासगी ट्रस्टला देण्यात आली. तिचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे १०० कोटी रुपये आहे, असेही भंडारी यांनी म्हटले आहे.

कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील १९ एकर सरकारी जमीनही खर्गे यांच्या ट्रस्टला हस्तांतरित केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्तेचा वापर करून ही जमीन कशी बळकावली, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी मागणी भंडारी यांनी केली आहे. जमीन खर्गे यांच्या ट्रस्टच्या नावे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यासाठी एक बनावट विक्रेता तयार करण्यात आला होता. ती जमीन विकणारी खरी व्यक्ती कोण होती, हे आजही कोणालाच माहीत नाही. अशाप्रकारे भ्रष्टाचाराद्वारे ही जमीन ट्रस्टच्या नावे नोंदवण्यात आली आहे, असाही आरोप भंडारी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news