Bageshwar Dham Foreign Funding pudhari
राष्ट्रीय

Bageshwar Dham Foreign Funding: गृह मंत्रालयाची कृपा! धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धामला आता परदेशातूनही मिळणार 'देणगी'

Anirudha Sankpal

Bageshwar Dham Foreign Funding: धीरेंद्र शास्त्री यांची संस्था बागेश्वर धाम यांना आता परदेशातून देणगी मिळण्याचा मार्ग मोकळाझाला आहे. मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला केंद्रीय गृह मंत्रालयानं फॉरेन कंट्रीब्यूशन रेगुलेशन एक्ट (FCRA) अंतर्गत परवानगी मिळाली आहे. आता धीरेंद्र शास्त्रींच्या या संस्थेला परदेशातून कायदेशीररित्या देणगी मिळणार आहे. आतापर्यंत परदेशातून देणगी मिळवण्यासाठी संस्थेला विशेष परवानगीची गरज होती.

धीरेंद्र शास्त्रींचे परदेशातही फॉलोअर्स

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या देखरेखीखाली बागेश्वर जन सेवा समिती ग्राम गडा छतरपूर येथून काम करते. ही संस्था धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात सक्रीय आहे.

गेल्या काही काळापासून बागेश्वर बाबा या नावानं प्रसिद्ध झालेल्या धिरेंद्र शास्त्री सतत चर्चेत असतात. त्यांच्या प्रवचन कार्यक्रमात मोठ्या संख्येनं लोकं येत असतात. त्यांचे फॉलोअर्स देशातच नाही तर परदेशात देखील आहेत. अशा परिस्थितीत संस्थेसाठी आता परदेशातून देणगी मिळण्याचा मार्ग मोकळा होणे खूप महत्वाचे ठरले आहे.

FCRA नियम

एफसीआरएबाबतच्या नियमांबद्दल बोलायचं झालं तर FCRA जी कोणती संस्था परदेशातून देणगी घेते त्या संस्थेला त्यांचा पूर्ण हिशेब ठेवणं बंधनकारक आहे. सरकारला हा पैसा कुठून आला आणि कुठं खर्च झाला याची माहिती देणे बंधनकारक आहे. या पैशाची देवाण घेवाण ही बँक खात्यामार्फत होते. याचा नियमीत अहवाल द्यावा लागतो.

१५ एप्रिल २०२६ पर्यंत FCRA अंतर्गत १४ हजार ५३८ एनजीओ पाच वर्षाच्या नोंदनीद्वारे सक्रिय आहे. २०१५ पासून आतापर्यंत १८००० पेक्षा जास्त लायसन्स रद्द करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT