Plane Crash in Ahmedabad x
राष्ट्रीय

Plane Crash in Ahmedabad | औरंगाबाद ते अहमदाबाद; जाणून घ्या 1993 ते 2025 या काळातील भारतातील भीषण विमान दुर्घटना...

Plane Crash in Ahmedabad | मंगळूर येथील अपघातात 158 प्रवाशांचा झाला होता मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Plane Crash in Ahmedabad Major plane crash in India

नवी दिल्ली - भारताच्या विमान वाहतूक इतिहासात असे काही क्षण आहेत जे काळजाला हादरवणारे ठरले आहेत. तांत्रिक बिघाड, मानवी चूक, हवामानाची अनिश्चितता आणि धोकादायक रनवे अशा कारणांमुळे देशात अनेक वेळा भीषण विमान अपघात झाले आहेत.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या प्रवासी विमानाचा आज (12 जून 2025) अहमदाबाद विमानतळाजवळ मेघाणीनगर परिसरात अपघात झाला. विमानात 232 प्रवासी आणि क्रु सदस्य होते.

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर पुन्हा एकदा लोकांचे लक्ष गेल्या दशकभरात घडलेल्या मोठ्या अपघातांकडे वळले आहे. देशात यापुर्वी कोझिकोड (2020), मंगळुरू (2010), पाटणा (1998), औरंगाबाद (1993) येथील विमान अपघातांनी देशाला धक्का दिला आणि विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. जाणून घेऊया भारतातील मोठे प्रवासी विमानांचे अपघात...

1. कोझिकोड विमान अपघात – 2020

  • दिनांक: 7 ऑगस्ट 2020

  • विमान: एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX-1344 (बोइंग 737-800)

  • मार्ग: दुबई ते कोझिकोड (वंदे भारत मिशन)

  • परिस्थिती: जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानता

  • घटना: रनवे ओव्हरशूट, विमान 30 फूट खोल दरीत कोसळले

  • मृत्यू: 21 मृत (दोन्ही वैमानिकांसह), 100+ जखमी

2. मंगळुरू विमान अपघात – 2010

  • दिनांक: 22 मे 2010

  • विमान: एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX-812 (बोइंग 737-800)

  • मार्ग: दुबई ते मंगळुरू

  • घटना: टेबलटॉप रनवेवर लँडिंग करताना विमान घसरले व दरीत कोसळले

  • मृत्यू: 158 मृत, फक्त 8 जण बचावले

3. पाटणा विमान अपघात – 1998

  • दिनांक: 17 जुलै 1998

  • विमान: अलायन्स एअर फ्लाइट 7412 (बोइंग 737-2A8)

  • घटना: लँडिंग दरम्यान विमान नियंत्रण बाहेर गेले, घनवस्तीत कोसळले

  • मृत्यू: 60 (55 प्रवासी व 5 जमिनीवर)

4. औरंगाबाद (महाराष्ट्र) विमान अपघात – 1993

  • दिनांक: 26 एप्रिल 1993

  • विमान: इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 491 (बोइंग 737-2A8)

  • घटना: टेकऑफ दरम्यान विमान रनवेवर आलेल्या ट्रकला धडकले

  • मृत्यू: 55 प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT