राष्ट्रीय

Lok sabha Election 2024 Results : हमीरपूरमधून अनुराग ठाकूर पाचव्यांदा विजयी

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथून भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी  सलग पाचव्यांदा मोठा विजय  मिळविला. या विजयाबद्दल त्यांनी हमीरपूरच्या जनतेचे आभार मानले.

अनुराग ठाकूर यांनी भाजपचा गड राखून काँग्रेसचे सतपाल सिंग रायजादा यांचा पराभव केला. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले ठाकूर हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ राज्यमंत्री होते. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT