खोऱ्यात दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र... कुपवाडामध्ये आणखी एका दहशतवाद्याचे घर उडवले File Photo
राष्ट्रीय

pehelgam news | खोऱ्यात दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र... कुपवाडामध्ये आणखी एका दहशतवाद्याचे घर उडवले

मोनिका क्षीरसागर

Pahalgam terrorist attack Action Against Terror by Security Forces

श्रीनगर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर खोऱ्यात जलद कारवाई सुरूच आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तसेच, दहशतवाद्यांच्या अनेक लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आणि दहशतवाद्यांच्या मोठ्या संख्येने साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी आदिल हुसेन ठोकर आणि आसिफ शेख यांची वेगवेगळी घरे स्फोटाने उडवून दिली आहेत. आता आणखी एका लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचे घरही उडवून देण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम, कुपवाडा, जैनापोरा, बांदीपोरा आणि त्राल येथे वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली आणि १० दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली.

'या' दहशतवाद्यांची घरे मातीत गाडली

अनंतनागमधील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुररानमधील अहसान उल हक शेख, पुलवामा येथील त्रालमधील आसिफ अहमद शेख, चोटीपोरा, शोपियानमधील शाहिद अहमद कुट्टे आणि कुलगाममधील मतलहामा येथे जाहिद अहमद गनी यांची घरे उद्ध्वस्त झाली. जाहिद अहमद हा लष्कर/टीआरएफशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, कुपवाडाच्या कलारस येथील फारुख अहमद तेडवा आणि झैनापोराच्या मेल्हुरा येथील अदनान शफी दार (टीआरएफशी संलग्न) यांची घरे देखील मातीमोल करण्यात आली आबेत.

लष्कराने शोपियानमधील दरमदोरा येथील लष्कर-ए-तोयबाच्या संलग्न संघटनेच्या अमीर अहमद दार यांचे घर उडवून दिले आहे. तर बांदीपोराच्या नाझ कॉलनीतील जमील अहमद शेर गोजरी यांचे घर उद्ध्वस्त केले आहे. तो २०१६ पासून खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. याशिवाय जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या अमीर नझीरचे घरही जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्याचे घर त्रालमध्ये होते.

'हा' दहशतवादी पाकिस्तानात राहून करतोय कारवाई

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील नारिकूट कलारस येथील रहिवासी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारूक अहमद तीदवा याचे घरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दहशतवादी फारुख तीदवा यांचे घर उडवून दिले आहे. स्फोटाच्यावेळी फारुख घरी नसला तरी तो बराच काळ पाकिस्तानात लपून बसला आहे. त्याच्यावर पाकिस्तानी सैन्यासोबत मिळून काश्मीरमध्ये निष्पाप लोकांना मारण्याचा आरोप आहे. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी दहशतवादी फारुखचे आणखी एक घर उडवून दिले. याशिवाय, शोपियानमधील वंडीना झैनापोरा येथील रहिवासी सक्रिय दहशतवादी अदनान शफीचे आणखी एक घर उडवून देण्यात आले. तो एक वर्षापूर्वी दहशतवादी गटात सामील झाल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT