Amit Shah On Rahul Gandhi pudhari
राष्ट्रीय

Amit Shah On Rahul Gandhi: तुम्ही परदेशात का जाऊन बसलाय? एकदा दिल्लीत लँड करा.. गृहमंत्री अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Amit Shah Vs Rahul Gandhi: मी सांगतोय की पुढची ३० वर्षे तुमचा नंबर लागणार नाही - अमित शहा

Anirudha Sankpal

Amit Shah On Rahul Gandhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील एका कार्यक्रावेळी काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टिका केली आहे. त्यांनी तुम्ही परदेशात का जाऊन बसलाय हे देखील सांगत नाही. ते तुमचे वैयक्तिक आयुष्य आहे. एकदा दिल्लीत लँड करा माझे बोलणे ऐकून ठेवा. पुढची ३० वर्षे तुमचा नंबर लागणार नाही.

तुम्ही विदेशात बसला आहात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्ली जल बोर्डाच्या ८ हजार ९४१ कोटी रूपयांच्या ४३ योजनांचे उद्धाघटन केले आणि कोणशिला ठेवली. यावेळी बोलताना अमित शहा यांनी राहुल गांधीवर टीका करताना, मला माहिती आहे की तुम्ही माझा आवाज ऐकू शकत नाही. तुम्ही विदेशात बसला आहात. मात्र तुम्ही विदेशात का बसला आहेत हे सांगत नाही. ते तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे.'

एकदा तुम्ही दिल्लीत लँड करा..

शहा पुढे म्हणाले, एकदा तुम्ही दिल्लीत लँड करा माझं बोलणं ऐका पुढची ३० वर्षा तुमचा नंबर लागणार नाहीये. शहा यांनी धरणे प्रदर्शनांनी काही होत नसतं. त्यासाठी निवडून यावं लागतं. लोकांसाठी काम करावं लागतं. पंजाबच्या जनतेने ठरवलं आहे की यावेळी पंजाबमद्ये एनडीएचं सरकार येणार आहे.

आम्ही जनतेत जातो

अमित शहा यांनी भारतीय जनता पार्टीचा बूथ कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान मोदींपर्यंत करोडो कार्यकर्ता जनतेत राहून त्यांचे दुःख वेदना समजून घेतात. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतात असे देखील सांगितले.

यमुनेचेच उदाहरण घ्या. तुमचे सरकार ३० वर्षे होते. मात्र यमुना नदीसाटी काही केलं नाही. यमुनोत्री पासून संगमपर्यंत संपूर्ण यमुना स्वच्छ करण्याचं सौभाग्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT