air warning received from air force station chandigarh of possible attack sirens sounded
चंदीगड : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानच्या होणाऱ्या आगळीकिला भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गुरूवारी रात्री पाकिस्तानने भारतातील शहरांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकने पुन्हा एकदा पंजाबमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारतीय सैन्याने निष्प्रभ केले.
वायुदलाच्या स्टेशनकडून संभावित अल्ल्याची चितावणी मिळाल्यावर चंदीगडमध्ये आज हवाई हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन वाजत आहेत. याशिवाय मोहालीतही लोकांना सतर्क केले जात आहे.
पंजाबला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एअर फोर्स स्टेशनकडून जारी केलेल्या इशाऱ्यात म्हटलंय की, सभावित हल्ल्याच्या दृष्टीने सतर्कता आवश्यक आहे. चंदीगड प्रशासनाने तात्काळ कारवाई करत लोकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या छतावर जाणे टाळावे असे सक्तपणे सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशी परिसरात सतर्कता बाळगली जात आहे. प्रत्येक संदिग्ध हालचालींवरही बारिक लक्ष ठेवले जात आहे.
एअरफोर्सचे रडार सिस्टिम पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर ठेवण्यात आले आहेत. आकाशातील प्रत्येक संदिग्ध हालचालिंवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून काल (गुरूवार) रात्री भारताच्या सीमेवरील गावांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांव्दारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याला भारतीय सुरक्षा दलाने निष्प्रभ केले.
पंजाबमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य सरकारने सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये पुढचे तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पाउल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या मुलांना घरातच ठेवावे आणि सुरक्षा निर्देशांचे पालन करावे. पंजाबच्या जालंधर येथील सुरनुसी ऑर्डिनेन्स फॅक्टरीलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. या ड्रोनला भारतीय सुरक्षा दलांनी योग्यवेळी निष्प्रभ केले. हा ड्रोन डॉ.बी.आर.आंबेडकर नॅशनल इंस्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर जवळ रोखले गेले. ज्यामुळे एक मोठा हल्ला टळला.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. काल गुरूवारी जम्मू-काश्मीरपासून जैसलमेरपर्यंत भारतातील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने हे हल्ले निष्प्रभ करून पाकला त्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सीमेत घुसणाऱ्या पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाउ विमानांना नष्ट करण्यात आले. यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळाले. कराची, लाहोर, सियालकोट आणि पेशावरसह अनेक शहरांवर भारतीय तीन्ही दलांच्या सैन्याने अचूक कारवाई केली.