अहमदाबाद विमान दुर्घटना File Photo
राष्ट्रीय

Air India crash Wrong bodies sent | ब्रिटनला चुकीचे मृतदेह पाठवले! अहमदाबाद अपघातानंतर मोठी गडबड, DNA जुळत नाहीत...

Air India crash Wrong bodies sent | ब्रिटनमधील दोन कुटुंबांना धक्का, परराष्ट्र मंत्रालय म्हणते- प्रोटोकॉल पाळला

Akshay Nirmale

Ahmedabad Air India plane crash Wrong bodies sent to Britain DNA mismatch

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातानंतर, ब्रिटनमधील काही पीडित कुटुंबांना चुकीचे मृतदेह पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या दोन पीडित कुटुंबांनी दावा केला आहे की, त्यांना त्यांच्या नातेवाइकांचे मृतदेह न मिळता इतर कोणाचेच मृतदेह सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या वकील जेम्स हीली यांच्या मते, या दोन्ही मृतदेहांचे DNA नमुने संबंधित कुटुंबीयांच्या नमुन्यांशी जुळले नाहीत.

ब्रिटनमधील डेली मेल या वृत्तपत्रात या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानुसार, एका कुटुंबाने अंतिम संस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र, DNA तपासणीत ताबूतात दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना अंतिम संस्कार थांबवावे लागले.

परराष्ट्र मंत्रालय म्हणते- प्रोटोकॉल पाळला होता...

या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैस्वाल यांनी सांगितले की, "ही बातमी आमच्या निदर्शनास आली असून, आम्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहोत.

या दुर्दैवी घटनेनंतर पीडितांची ओळख पटवताना सर्व प्रोटोकॉल आणि तांत्रिक प्रक्रिया काटेकोरपणे पाळल्या गेल्या होत्या."

ब्रिटनमधील अहवालानुसार धक्कादायक बाबी उघड

डेली मेल या ब्रिटिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काही ब्रिटिश कुटुंबांना चुकीच्या मृतदेहांची ओळख देऊन ते पाठवले गेले. यामध्ये काही प्रकरणांमध्ये एकाहून अधिक व्यक्तींचे अवशेष एकत्र मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. आतापर्यंत अशा दोन प्रकार समोर आले आहेत.

ही बाब समोर येण्यामागे वेस्ट लंडनमधील कोरोनर डॉ. फिओना विल्कॉक्स यांनी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुन्यांची जुळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.

विमान अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे विमानवाहतूक क्षेत्रातील वकील जेम्स हीली-प्रॅट यांनी सांगितले की, "आम्ही एअर इंडिया व त्यांचे आपत्कालीन सेवा पुरवणारे 'केन्यन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस' यांच्याकडून अधिकृत उत्तराची वाट पाहत आहोत."

एअर इंडियाकडून अधिकृत निवेदन नाही

एअर इंडियाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, मात्र त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, "प्रकरण समोर येताच आम्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून काम करत आहोत. भारतात पीडित मृतांचे ओळख पटवण्यासाठी सर्व प्रोटोकॉल आणि नियमांचे पालन करण्यात आले होते."

13 मृतदेह ब्रिटनमध्ये पाठवले

12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात एकूण 270 लोकांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमानात 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांसह एकूण 242 प्रवासी होते. भारतातून 13 मृतदेह ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते.

अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, "सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले होते."

एअर इंडियावर भरपाई टाळण्याचा केला होता आरोप

यापूर्वी ब्रिटनमधील स्टीवर्ट्स या कायदेशीर सल्लागार संस्थेने एअर इंडिया वर आरोप केला होता की, त्यांनी पीडित कुटुंबांकडून आर्थिक आणि संवेदनशील माहिती मागवली, ज्यामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांवर परिणाम होऊ शकतो. एअर इंडियाने मात्र हे आरोप फेटाळले होते.

स्टीवर्ट्स या संस्थेने सांगितले होते की, "एअर इंडिया अशा वर्तनामुळे सुमारे 1050 कोटी रुपये वाचवण्याचा प्रयत्न करत आहे." त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

एअर इंडियाकडून 1 कोटी भरपाईची घोषणा

हादशानंतर एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा ग्रुपने पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे मुआवजे जाहीर केले होते, तर एअर इंडियाने 25 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्याचे वचन दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT