नवी दिल्ली : 'एक बार जो मैने कमिट कर दिया तो मैं अपनी आप की भी नहीं सुनता, असा डायलॉग भारतीय हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांनी म्हटला. नवी दिल्लीतील भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) बिझनेस समिटला संबोधित करताना ए. पी. सिंह यांनी सलमान खानचा एक डायलॉग म्हणत हवाई दलाच्या तयारीचे उदाहरण दिले. ए. पी. सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने आपल्याला आपण कोणत्या दिशेने जात आहोत आणि भविष्यात आपल्याला काय हवे आहे याची स्पष्ट कल्पना दिली आहे. नौदल प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर युद्धाचे स्वरूप बदलत आहे, असेही ते म्हणाले.
ए. पी. सिंह म्हणाले की, आम्ही जगाप्रती भारताची वचनबद्धता पुन्हा सांगितली आहे. जीव जाईल पण वचन मोडता कामा नये, हे आमचे एकमेव ध्येय आहे. आता आपल्याला नेहमीच भविष्यासाठी तयार राहावे लागेल. आपण संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाच्या आधारे युद्ध जिंकले. संरक्षण दलांना बळकट करण्यासाठीही आपल्याला हाच दृष्टिकोन वापरावा लागेल, असेही ते म्हणाले.