विधान परिषद सभापती राम शिंदे  (File Photo)
राष्ट्रीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

Ahilyabai Holkar Jayanti: विधान परिषद सभापती राम शिंदेंनी दिले निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

Ahilyabai Holkar 300th birth anniversary

नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. विधान परिषद सभापती राम शिंदेंनी हे निमंत्रण दिले. राष्ट्रपतींनी तत्वतः सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे राम शिंदे म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपुर्वी राम शिंदेंनी पंतप्रधान मोदींनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राम शिंदे म्हणाले की, दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी या त्यांच्या जन्मगावी आणि महाराष्ट्रासह देशभरात साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या जन्मगावी भव्य स्वरूपात होणार आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपतींना मंगळवारी देण्यात आले. पत्रकार परिषदेला राम शिंदे यांच्यासह सांगली महानगर पालिकेच्या माजी महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर या उपस्थित होत्या.

राम शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील १२ ज्योर्तिलिंगांचा जीर्णोध्दार केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणीसह अनेक ऐतिहासिक, धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातुन घडले.

दरम्यान, चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात यापुर्वी तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचेही राम शिंदे म्हणाले.

राम शिंदे म्हणाले की, महिन्यात ६ मे २०२५ रोजी चौंडी, अहिल्यानगर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT