हरियाणानंतर भाजपचे ‘मिशन राजधानी’ Pudhari Photo
राष्ट्रीय

हरियाणानंतर भाजपचे ‘मिशन राजधानी’

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा भाजपला यश मिळाले. नायब सैनी 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता भाजपने ‘मिशन राजधानी’ला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे; मात्र दिल्लीमध्ये भाजपकडे मोठा चेहरा नाही, त्यासाठी पक्षाकडून शोध सुरू आहे. यावेळेस राजधानीत भाजप आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी महिला नेतृत्व देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चा सुपडासाफ झाला, तर सर्वांच्या भुवया उंचावणारे यश भाजपला मिळाले. त्यामुळे देशभरात भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. या आत्मविश्वासाला घेऊनच आतापासून दिल्ली भाजपने निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, खासदार बांसुरी स्वराज, खासदार मनोज तिवारी यांच्यासह इतर नेत्यांनी केजरीवाल आणि दिल्ली सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावरून धारेवर धरायला सुरुवात केली आहे.

अडीच दशकांपासून भाजप दिल्लीत विधानसभेत सत्तेबाहेर

गेल्या अडीच दशकांपासून दिल्ली विधानसभेत भाजप सत्तेबाहेर आहे. काँग्रेसच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर मागच्या 10 वर्षांपासून केजरीवालांचा पक्ष सत्तेत आहे; पण आजपर्यंत भाजपला दिल्लीत नेतृत्व उभारता आले नाही. अरविंद केजरीवाल यांच्या तोडीस तोड दिल्ली भाजपकडे नेता नाही. त्यानंतर आता अतिशी यांच्यामुळे नवे आव्हान भाजपसमोर उभे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मधील दिल्लीतील भाजपच्या सततच्या निवडणुकीतील पराभवाबाबतच्या लेखात, ‘भाजप किती काळ मोदी-शहांवर अवलंबून राहणार’ असा सवालही उपस्थित केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT