Vijay Divorce Case Update pudhari
राष्ट्रीय

Vijay Divorce Case Update: तमिळ नाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा.... पत्नी संगिताने घटस्फोटाची केस मागे घेतली

Anirudha Sankpal

Vijay Divorce Case Update: तमिळ नाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांची पत्नी संगिता सोरनलिंगम यांचा घटस्फोटाचा खटला स्थगित करण्यात आला आहे. विजय यांच्या पत्नीने आज त्यांची घटस्फोटाची केस मागे घेतली.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संगिता यांनी तमिळ नाडूच्या चेनगलपट्टू कोर्टात घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. त्यांना विजयसोबतचं लग्न संपवायचं होतं.

विजय आणि संगिता यांच्या कोर्टातील वैवाहिक वादाच्या खटल्याची सुनावणी या वर्षी अनेकवेळा रद्द करावी लागली होती. गेल्या महिन्यात न्यायमूर्तींनी विजय आणि संगिता उपस्थित नसल्यामुळं सुनावणी रद्द केली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी ठेवण्यात आली.

या सुनावणीला देखील विजय आणि संगिता वैयक्तिकरित्या उपस्थित नव्हते. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी त्यांचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी कोर्टाला विजय आणि संगिता वैयक्तिकरित्या सुनावणीला हजर राहू शकत नाहीत असं सागंितलं.

संगिता यांनी आपल्या याचिकेत विजय सोबतचं लग्न संपवण्याची विनंती केली होती. आमच्या दोघांमध्ये भरून न येणारे मतभेद असल्याचा त्यांचा दावा होता. त्यांना पोटगी हवी होती आणि चेन्नई येथील नीलंकारी मधील घरात राहण्याची परवानगी देखील हवी होती.

विजय आणि संगिता यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी लग्न केलं होतं. त्यांनी चेन्नईत हिंदू पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यांचा पहिला मुलगा २६ ऑगस्ट २००० रोजी जन्माला आला. त्यानंतर या जोडप्याने २००५ मध्ये मुलीला देखील जन्म दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT