Arshad warsi wife maria Share market scam Pudhari
राष्ट्रीय

Arshad Warsi SEBI ban | अभिनेता अरशद वारसीसह त्याच्या पत्नीवर शेअर बाजारात बंदी; सेबीची कारवाई, कृत्रिमरित्या वाढवली शेअरची किंमत...

Arshad Warsi SEBI ban | एकूण 57 जणांची बाजारातून हकालपट्टी; युट्यूबच्या खोट्या टिप्समुळे कोट्यवधींची फसवणूक

Akshay Nirmale

Arshad Warsi SEBI ban Sadhna Broadcast stock scam pump and dump case

मुंबई : लोकप्रिय अभिनेता अरशद वारसी, त्यांची पत्नी मारिया गोरेटी आणि त्यांच्या भावावर भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (SEBI) एक वर्षासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास बंदी घातली आहे.

साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड) या कंपनीच्या शेअरमधील मोठ्या प्रमाणावर "पंप अँड डंप" प्रकारच्या फसवणूक योजनेत सहभागी असल्याचे सेबीच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?

मार्च 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत साधना ब्रॉडकास्ट या कंपनीच्या शेअरची किंमत कृत्रिमरीत्या वाढवण्यात आली आणि नंतर ती मोठ्या प्रमाणावर विकून खोट्या माहितीत गुंतलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 60 जणांचा सहभाग असल्याचे सेबीने स्पष्ट केले आहे.

अरशद वारसी यांची भूमिका काय?

सेबीच्या अहवालानुसार, अरशद वारसी यांनी स्वतःच्या, पत्नीच्या आणि भावाच्या डीमॅट खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग केली. मनीष मिश्रा नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप संवादही सापडले असून, त्यामध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करण्याची ऑफर दिली गेली होती.

त्यानंतर सेबीने अरशद वारसी, मारिया गोरेटी आणि त्यांच्या भावास एक वर्षासाठी बाजारात गुंतवणूक करण्यास बंदी घातली असून, प्रत्येकी 5 लाखांचा दंड तसेच 1.05 कोटी रुपयांची अवैध कमाई परत करण्याचे आदेश दिले आहेत.

कशी झाली फसवणूक?

या प्रकरणात युट्यूब चॅनेल्सचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आला. The Advisor, Midcap Calls, Profit Yatra, Moneywise, India Bullish यासारख्या चॅनेल्सवरून साधना ब्रॉडकास्टच्या भविष्यासंदर्भात खोट्या व आशादायक बातम्या प्रसारित करण्यात आल्या.

या माहितीच्या आधारे अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी केल्याची माहिती आहे.

प्रमुख आरोपी व कारवाई:

मनीष मिश्रा : फसवणुकीचा प्रमुख सूत्रधार, 5 कोटी रुपयांचा दंड

गौरव गुप्ता : सर्वाधिक नफा कमावलेला (18.33 कोटी रूपये), रक्कम परत करण्याचे आदेश

साधना बायो ऑइल्स प्रा. लि. : 9.41 कोटी रूपये नफा, रक्कम परत करावी लागणार

इतर आरोपी : राकेश गुप्ता, सुभाष अग्रवाल, पियूष अग्रवाल, लोकेश शाह यांच्यावर प्रत्येकी 2 कोटी रुपये दंड

IPS अधिकारी : प्रकरण सेटलमेंटमार्फत मिटवले

गुंतवणूकदारांसाठी धडा

हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. सेबीने यावेळी हे स्पष्ट केले आहे की "सोशल मीडियावर आधारित शेअर टिप्स तपासून पाहिल्या नाहीत, तर मोठी फसवणूक होऊ शकते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT