अभिजीत दिपके यांना आज सतर्श जामीन मंजूर झाला. यानंतर त्‍यांनी 'वीर-झारा' चित्रपटातील शाहरुख खानच्या वृद्ध लूकचा फोटो वापरून एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. 
राष्ट्रीय

Abhijit Dipke : 'कसं वाटतंय.....': जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपकेंनी शाहरुख खानच्या फोटोसह शेअर केली मजेशीर पोस्ट

Abhijit Dipke Shah Rukh Khan Post : शांतता राखण्याबाबतच्या 'पीस बाँड' स्वाक्षरी केल्यानंतर सुटका

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Dipke Shah Rukh Khan Post : 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना आज (दि. १७) सतर्श जामीन मंजूर झाला. यानंतर त्‍यांनी 'वीर-झारा' चित्रपटातील शाहरुख खानच्या वृद्ध लूकचा फोटो वापरून एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. दरम्‍यान, शांतता राखण्याबाबतच्या बंधपत्रावर (पीस बाँड) स्वाक्षरी केल्यानंतर त्‍यांची सुटका करण्‍यात आल्‍याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

शांतताभंग प्रकरणी दीपकेंना झाली होती अटक

दिल्‍ली पोलिसांनी सांगितले की, 'दिल्ली पोलीस कायदा' (Delhi Police Act) च्या कलम ६५ अंतर्गत अभिजीत दीपके यांना ताब्यात घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली. यानंतर 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १२६ आणि १७० अन्वये शांतता भंग केल्याप्रकरणी त्‍यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आज त्‍यांना त्याला 'विशेष कार्यकारी दंडाधिकारी' यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. येथे त्‍यांना अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.

२४ तास वायफाय आणि फोनशिवाय....

'एक्स' (X) वर पोस्ट करत दिपके यांनी लिहिले, "२४ तास वायफाय आणि फोनशिवाय तुरुंगातून बाहेर पडल्यावर कसं वाटतंय!" दरम्‍यान, दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्था 'एएनआय' (ANI) ला सांगितले की, शांतता राखण्याचे आणि लागू असलेल्या अटींचे पालन करण्याचे लेखी आश्वासन (पीस बाँड) दिल्यानंतर दिपके यांची सुटका करण्यात आली आहे.

यापूर्वीही दीपकेंना घेण्‍यात आले होते ताब्‍यात

१० ऑक्टोबर रोजी दीपके यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते, तेव्हाही त्यांच्याविरुद्ध शांतता भंग केल्याप्रकरणी एक स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी, एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता राखण्याचे आश्वासन देणाऱ्या बंधपत्रावर (bond) स्वाक्षरी करायला लावली होती. दीपके यांच्‍यासोबतच दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिलाही ताब्यात घेतले होते, मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली होती.

अटकेची कारवाई बेकायदेशीर : नेहा बोरा

सुटकेनंतर माध्‍यमांशी बोलताना नेहा बोरा म्‍हणाल्‍या की, "मला मंडी हाऊस येथून ताब्यात घेण्यात आले आणि पहाटे ५:०० वाजेपर्यंत (पोलीस ठाण्यात) ठेवण्यात आले. पोलीस अशा प्रकारची बेकायदेशीर धरपकड का करत आहात? देशात हे दीर्घकाळापासून सुरू आहे. या आंदोलनामुळे अशा प्रकारच्या अटकेचा प्रकार समोर आला आहे. या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचा आणि नियमांनुसार काम करण्याचा दावा करतात, परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडत नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT