Abhijeet Dipke on Congress  Pudhari
राष्ट्रीय

Abhijeet Dipke on Congress: CJP आणि काँग्रेस एकत्र आंदोलन का करत नाहीत? अभिजीत दिपकेने एका वाक्यात सांगितलं कारण

Abhijeet Dipke on Congress: CJP ही स्वतंत्र दबाव गट म्हणूनच काम करणार असून, ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.

Rahul Shelke

Abhijeet Dipke on Congress: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, काँग्रेस आणि CJP एकत्र लढवताना का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. CJP हा स्वतंत्र दबाव गट असून, स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवूनही ‘इंडिया’ आघाडीच्या समान उद्दिष्टांसाठी लढण्यास आमचा विरोध नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

काँग्रेससोबत एकत्र येण्याऐवजी स्वतंत्र भूमिका का?

कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्षाप्रमाणे निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होण्याऐवजी सध्या निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे काँग्रेससोबत थेट एकत्र निवडणूक लढवण्यापेक्षा स्वतंत्र दबाव गट म्हणून काम करण्यावर CJP चा भर असल्याचे दिपके यांच्या विधानातून स्पष्ट होते.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिपके यांनी CJP ही स्वतंत्र संघटना असल्याचे सांगितले. ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात आमची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि लोकशाही मजबूत करणे, हे दोन्ही बाजूंच्या लढ्याचे समान उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक आयोगावर दिपके यांचा गंभीर आरोप

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकांमध्ये फेरफार होत असल्याचा आणि पंतप्रधानांना सत्तेत टिकून राहण्यासाठी मदत केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारांविरोधात आपला लढा सुरू असल्याचे दिपके यांनी म्हटले.

दिल्लीतील आंदोलनानंतर CJP च्या नेत्यांवर कारवाई

एकीकडे CJP ची राजकीय भूमिका चर्चेत असताना, दुसरीकडे दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनामुळेही संघटना चर्चेत आली आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात विशेष न्यायालयाने आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT