पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने (आप) पक्षांतर्गंत मोठा बदल केला आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची पंजाब प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सत्येंद्र जैन यांना सह-प्रभारी बनवण्यात आले आहे.
मनीष सिसोदिया यांची पंजाबचे प्रभारी, तर दिल्ली प्रभारपदी गोपाळ राय यांच्या जागी सौरभ भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोपाल राय यांच्याकडे गुजरातची तर पंकज गुप्ता यांच्याकडे गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीसाठी आज खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह यांनी राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हजर होते.
दिल्लीतील पराभवानंतर आतिशी यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. त्या दिल्ली सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी राजकीय रणनीती आखतील. मात्र, दिल्ली युनिटच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी गोपाळ राय यांच्याकडेच राहणार आहे.