पजांबमध्ये 'आप' आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू! Pudhari Photo
राष्ट्रीय

पजांबमध्ये 'आप' आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू!

पोलिसांकडून तपास मोहिम सुरु

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उघडकिस आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आमदाराला तातडीने डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस उपायुक्त (डीसीपी) जसकरण सिंह तेजा यांनी सांगितले की, "ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आणि जेव्हा त्यांना डीएमसी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे." गोगी २०२२ मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले आणि लुधियाना विधानसभा निवडणुकीत दोन वेळा काँग्रेसचे माजी आमदार भारत भूषण आशु यांचा पराभव केला.

गोळी लागल्याने आमदाराचा मृत्यू

रात्री उशिरा, लुधियाना पश्चिमेतील आप आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचे गोळी लागून निधन झाले. गंभीर अवस्थेत त्यांना डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीएमसीच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार करत होते, पण त्यांना वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोगी एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतले होते आणि त्यांच्या खोलीत जेवण करत होते. यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

गोळीबाराचे कारण स्पष्ट नाही

गोगी यांचा आवाज ऐकून आमदाराच्या पत्नी डॉ. सुखचैन कौर ताबडतोब खोलीत गेल्या. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्याला ताबडतोब डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. गोगीवर त्याच्याच परवानाधारक पिस्तूलने गोळीबार झाल्याचे मानले जात आहे. पण गोळी कोणत्या परिस्थितीत झाडण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतिक्षा

तथापि, डीसीपी जसकरण सिंह तेजा म्हणाले की, गुरप्रीत गोगी यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, त्यांचा मृतदेह डीएमसी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टेम केले जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चुकून स्वतःवर गोळी झाडली. त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

गुरप्रीत गोगी कोण आहे?

गुरप्रीत बस्सी गोगी हे त्यांच्या समर्थकांमध्ये गोगी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले होते. या निवडणुकीत गुरप्रीत सिंह गोगी यांना सुमारे 40 हजार मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण दुसऱ्या क्रमांकावर होते, तर अकाली दलाचे महेशइंदर सिंग ग्रेवाल तिसऱ्या क्रमांकावर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT