डोडा मतदारसंघातून आपचे उमेदवार मेहराज मलिक विजयी झाले आहेत.  (AAP X account)
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये 'आप'ने खातं उघडलं: कोण आहेत विजयी झालेले मेहराज मलिक?

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Election Results) नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत पीडीपीला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपनेही लक्षणीय २९ जागांवर विजय मिळवला आहे. तर आपने (Mehraj Malik) एक जागा जिंकत विधानसभेत खाते उघडले आहे.

दरम्यान, डोडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक (Mehraj Malik) चार हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार गजयसिंह राणा यांचा पराभव केला आहे. डोडा मतदारसंघात काँग्रेसने शेख रियाझ अहमद यांना, तर नॅशनल कॉन्फरन्सने खलिब नजीब सुहरवर्दी यांना उमेदवारी दिली होती. परंतु, येथे भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये काटाजोड आणि चुरशीची लढत झाली. आणि यात आप उमेदवाराने बाजी मारली. (Jammu Kashmir Election Results)

कोण आहे मेहराज मलिक?

मेहराज मलिक हे प्रदीर्घ काळापासून आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. ते डोडा परिसरातील लोकप्रिय नेते मानले जातात. मलिक यांनी मागील काही वर्षांत डोडामध्ये मोठा लोकसंपर्क तयार केला आहे. ३६ वर्षीय मलिक यांनी २०२१ मध्ये डीडीसी निवडणुकीत विजय संपादन केला होता. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आपच्य़ा तिकीटावर शानदार विजय मिळवला. मेहराज मलिक यांनी पीजीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेऊन त्यांनी मोठी गर्दी जमवत शक्तीप्रदर्शन केले होते. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले होते. या जाहीर सभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह देखील सहभागी झाले होते.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून मलिक यांची प्रशंसा 

दरम्यान, मेहराज मलिक यांच्या विजयावर आम आदमी पार्टीचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना तुम्ही निवडणूक चांगली लढवली, असे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT