जम्मू- काश्मीरमध्ये NC- काँग्रेसचे सरकार, ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री

Jammu Kashmir Election Results | नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेस आघाडीला बहुमत
Jammu Kashmir Election Results
नॅशनल कॉन्‍फरन्‍स नेते आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍ला. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Election Results) नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेस आघाडीने (National Conference-Congress alliance) बहुमताची निर्णायक आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जाहीर केलेल्या ट्रेंडनुसार राज्‍यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांनी २४ जागांवर आघाडी घेतली होती. भाजपने १५ जागा जिंकल्या असून त्यांनी १४ जागांवर आघाडी घेतली आहे. पीडीपीने २ जागा जिंकल्या असून त्यांनी २ जागांवर आघाडीवर घेतली आहे. दरम्यान, या निकालावर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मला आशा आहे की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनतील.'' असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

१० वर्षांनंतर जनतेने आम्हाला जनादेश दिला- फारुख अब्दुल्ला

ते पुढे म्हणाले, "१० वर्षांनंतर लोकांनी आम्हाला जनादेश दिला. आम्ही 'अल्लाह'कडे प्रार्थना करतो की आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. येथे पोलीसराज नाही तर जनताराज असेल." आम्ही तुरुंगातील निरपराध लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. येथे माध्यमांना स्वातंत्र्य असेल. आम्हाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की इंडिया आघाडीतील पक्ष जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आमच्यासोबत संघर्ष करतील. मला वाटते की ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) मुख्यमंत्री होतील."

ओमर अब्दुल्ला यांनी दोन जागांवर लढवली निवडणूक

ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. ओमर यांनी बडगामची जागा १८,४८५ मतांनी जिंकली आहे, तर गांदरबलमधून ते १०,२०० मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.

PDP ला धक्का, मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांचा पराभव

दरम्‍यान, जम्‍मू- काश्मीरमधील निवडणुकीत पीडीपी पक्षाच्‍या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांना धक्का बसला आहे. श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झाला आहे. येथे नॅशनल कॉन्फरन्सचे बशीर अहमद शाह विरी यांनी ९,७७० मतांनी विजय मिळवला आहे. दुपारी ३ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार, पीडीपीचे २ उमेदवार जिंकले असून २ आघाडीवर आहेत.

Jammu Kashmir Election Results
Vinesh Phogat | विनेश फोगाट यांनी मैदान मारलं! भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news