Aadhaar Card Fake Circular :
आधार कार्ड अपडेटबाबतचं एक परिपत्रक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यात १५ ऑगस्ट २०२५ पासून गोपनियता आणि डाटा सुरक्षेसाठी काही बदल लागू होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या परिपत्राकात आता १८ वर्षावरील व्यक्तीच्या आधार कार्डवर वडील किंवा पतीचं नाव नमुद करण्यात येणार नाही. याचबरोबर आधार कार्डावर फक्त पत्ता आणि जन्माचं साल एवढंच नमुद केलेलं असेल, जन्म तारखेतील दिवस आणि महिना नमुक केलेला नसेल असा दावा करण्यात आला होता.
दरम्यान, अनेक युट्यूब चॅनल, वेबसाईट आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, पत्रकारांनी याबाबतची माहिती प्रसारित केली. त्यांनी UIDAI ने काही नवे नियम १५ ऑगस्टपासून लागू केल्याचं म्हटलं. यात टेक्निकलवाले हौसला, व्हीके सर मस्ती, न्यू अपडेट ऑनलाईन यासह अनेक वेबसाईटनी आधार कार्डवरील या बदलाबाबतची माहिती प्रसारित केली होती.
मात्र या माहितीबाबत अल्ट न्यूजनं फॅक्ट चेक केलं आहे. त्यात त्यांनी कीवर्ड सर्चद्वारे व्हायरल क्लेम सत्य आहे का याची पडताळणी केली. त्यानंतर अल्ट न्यूजला याबाबतची कोणतीही बातमी किंवा सूत्रांकडून मळालेली माहिती आढळून आली नाही. याचबरोबर अल्ट न्यूजनं UIDAI ची अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँटल्स देखील सर्च केले. यात इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अकाऊंट्सचा समावेश होता. मात्र तिथंही या नव्या बदलांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.