Aadhaar Card Email ID Update Online  File Photo
राष्ट्रीय

Aadhaar कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'ईमेल' आयडी मोफत अपडेट करण्याची 'डेडलाईन' आली जवळ

Aadhaar Card Email ID Update Online : मुदतीनंतर आधारमध्ये ईमेल अपडेट करण्यासाठी शुल्क लागू होण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

Aadhaar Card Email ID Update Online : आधार कार्डमध्ये ईमेल आयडी अपडेट किंवा लिंक करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) नव्या ‘Aadhaar App’ द्वारे ईमेल आयडी जोडण्याची आणि अपडेट करण्याची मोफत सुविधा फक्त ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध करून दिली आहे. या मुदतीनंतर आधारमध्ये ईमेल अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क द्यावे लागू शकते.

ईमेल आयडी मोफत अपडेट करण्‍यासाठी काही दिवसांचा अवधी

आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. त्यामुळे आधारमधील तुमची सर्व माहिती अद्ययावत (अपडेटेड) असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही अजूनही तुमचा ईमेल आयडी आधारशी लिंक केला नसेल किंवा जुना ईमेल आयडी बदलायचा असेल, तर ही प्रक्रिया मोफत पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काहीच दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

३१ डिसेंबर २०२६ नंतर मोजावे लागणार शुल्क

सध्या आधार ॲपद्वारे ईमेल पत्ता जोडण्यासाठी किंवा तो बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, ही मोफत सेवा कायमस्वरूपी नसून ३१ डिसेंबर २०२६ नंतर यासाठी ७५ रुपये फी भरावी लागेल. दिलासादायक बाब म्हणजे, या कामासाठी तुम्हाला कोणत्याही आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमधील नव्या Aadhaar App च्या मदतीने घरबसल्या ईमेल अपडेटची रिक्वेस्ट पाठवू शकता.

ईमेल अपडेटसाठी आवश्यक गोष्टी

आधारमध्ये नवीन ईमेल आयडी जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहेत...

  • स्मार्टफोनमध्ये UIDAI चे अधिकृत Aadhaar App.

  • आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (लॉगिनच्या वेळी ओटीपी मिळवण्यासाठी).

  • नवीन ईमेल आयडी (ज्यावर व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी पाठवला जाईल).

  • ॲपद्वारे 'फेस ऑथेंटिकेशन' (चेहरा प्रमाणीकरण) करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Aadhaar App द्वारे ईमेल आयडी अपडेट करायच्‍या सोप्या स्टेप्स...

१) ॲपमध्ये लॉगिन करा

मोबाईलमध्ये Aadhaar App डाउनलोड करा. ॲप आधीपासून असल्यास ६ अंकी पिन किंवा बायोमेट्रिकद्वारे लॉगिन करा. पहिल्यांच डाउनलोड केले असल्यास, आधार नंबर टाकून लॉगिन प्रक्रिया सुरू करा.

२) ओटीपी प्रविष्ट करा

तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकून लॉगिन पूर्ण करा. त्यानंतर ॲपमधील 'Services' या विभागावर जा.

३) ईमेल आयडी टाका

येथे तुम्हाला 'Email Add/Update' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला जो नवीन ईमेल आयडी लिंक करायचा आहे, तो प्रविष्ट करा.

४) ईमेल व्हेरिफिकेशन करा

तुम्ही प्रविष्ट केलेल्या नवीन ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठवला जाईल. ईमेल इनबॉक्स तपासून तो ओटीपी ॲपमध्ये टाका आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

फेस ऑथेंटिकेशन आणि सबमिट

ईमेल व्हेरिफिकेशननंतर फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याद्वारे फेस ऑथेंटिकेशनची (Face Authentication) प्रक्रिया पूर्ण करा. स्क्रीनवरील सूचनांचे पालन करत चेहरा स्कॅन झाल्यावर माहितीची पुन्हा एकदा खात्री करा आणि तुमची रिक्वेस्ट सबमिट करा.

नागरिकांना आपली संपर्क माहिती अपडेट ठेवता यावी आणि महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळाव्यात, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे. हे शुल्कमाफ फक्त आधार मोबाईल ॲपद्वारे केलेल्या ईमेल अपडेटसाठीच लागू असेल, असे UIDAI ने स्पष्ट केले आहे.

लग्न किंवा घटस्फोटानंतर नाव अथवा आडनाव बदलण्याचे नियम

लग्नानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना आपले आडनाव बदलायचे आहे, त्यांनी ओळखपत्राच्या पुराव्यासोबत (Proof of Identity) 'Annexure D' हे शपथपत्र जोडणे बंधनकारक आहे. हे आडनाव बदल केवळ विवाह किंवा घटस्फोटामुळेच झाले असून, यामुळे संबंधित व्यक्तीची मूळ ओळख बदलत नाही, हे या शपथपत्रात नमूद असणे आवश्यक आहे.याशिवाय, लिंग बदलाच्या (Gender Change) प्रकरणांमध्ये नाव अपडेट करण्यासाठी मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या असून, त्यासाठी वैध ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT