एका खासगी कंपनीचे बिघाड झालेले हेलिकॉप्टर उत्तराखंडधील केदारनाथ येथून गौचरला उचलून नेले जात असताना कोसळले. (Pics: SDRF)
राष्ट्रीय

हवेतच दोर तुटला! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाहा Video

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

एका खासगी कंपनीचे बिघाड झालेले हेलिकॉप्टर उत्तराखंडधील केदारनाथ येथून गौचरला उचलून नेले जात असताना कोसळले. हे बिघाड झालेले दुरुस्तीसाठी हेलिकॉप्टर MI-17 हेलिकॉप्टरने उचलून नेले जात होते. या दरम्यान आज शनिवारी सकाळी हवेत असताना दोर तुटल्यामुळे ते खाली पडले. हे हेलिकॉप्टर लिंचोली येथील मंदाकिनी नदीजवळ कोसळले. (Kedarnath Helicopter crash) या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

"आज सकाळी राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) बचाव पथकाला लिंचोली येथील पोलिसांमार्फत या घटनेची माहिती मिळाली. एका खासगी कंपनीचे बिघाड झालेले हेलिकॉप्टर दुसऱ्या एका हेलिकॉप्टरद्वारे श्री केदारनाथ हेलिपॅड येथून गोचर हेलिपॅडकडे उचलून नेले जात असताना लिंचोली येथील नदीत कोसळले. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, हवेतून कोसळणाऱ्या हेलिकॉप्टरचा Video पीटीआय वृत्तसंस्थेने X ‍‍वर शेअर केला आहे.

Uttarakhand News : केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट

हे हेलिकॉप्टर याआधी केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सेवा देत होते. केदारनाथकडे जाणाऱ्या ट्रेक मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे ३१ जुलैपासून केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये ट्रेक मार्गावरील वाहतूक थांबल्याने यात्रेकरू हेलिकॉप्टरने मंदिराकडे जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT