Lok Sabha, Rahul Gandhi and Modi
'अग्नीवीर' योजनेवरून लोकसभेत खडाजंगी File Phot
राष्ट्रीय

Lok Sabha, Rahul Gandhi and Modi|'अग्नीवीर'वरून लोकसभेत खडाजंगी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अठराव्या लोकसभेच्या दुसऱ्या आठवड्यातील संसदेचे पहिले सत्र आज (दि.१ जुलै) सुरू आहे. या वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या 'अग्नीवीर' योजनेवरून खडाजंगी झाली.

'अग्नीवीर' म्‍हणजे वापरा आणि फेका योजना : राहुल गांधी

लँडमाइनच्या स्फोटात एका अग्निवीरने आपला जीव गमावला; पण त्याला 'शहीद' म्हटले नाही. अग्नीवीर याेजना ही केवळ वापरा आणि फेका अशी योजना आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. सत्ताधाऱ्यांना त्‍यांच्‍या विधानाचा तीव्र विराेध केला.

कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत; संरक्षणमंत्र्यांचे उत्तर

विरोधी पक्ष नेत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "राहुल गांधी चुकीची विधाने करून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय सीमेवर युद्धाच्यावेळी प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निवीरच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाते."

SCROLL FOR NEXT