8th pay commission: आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. आज ३१ ऑगस्ट ही कंत्राटी आधारावर नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी असणार आहे. जो कोणी उमेदवार आठव्या वेतन आयोगासोबत सल्लागार म्हणून काम करू इच्छितो त्या उमेदवाराला आज सोमवारी अर्ज करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. तुम्ही हा अर्ज आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन करू शकता.
ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना ईमेलद्वारे याची माहिती दिली जाईल. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना ७ दिवसांच्या आत ईमेलला उत्तर देण्याची संधी असणार आहे. त्यांना जास्तीजास्त ३० दिवसांच्या आत नोकरीवर हजर रहावे लागणार आहे. उमेदवाराच्या नावावर कोणतं क्रिमिनल रेकॉर्ड असून नये ही महत्वाची अट आहे.
वरिष्ठ सल्लागार पदासाठी २ जागा आहेत. त्यात १० वर्षाचा अनुभव, वयाची मर्यादा ही ४५ वर्षे आहे. सल्लागार म्हणून काम करण्यासाठी ६ वर्षाचा अनुभव आणि वयोमर्यादा ४० वर्षे असणार आहे. सल्लागार ( यंग प्रोफेशनल) साठी २ वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यासाठी एकूण १६ पदे आहेत. एकूण २३ पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही नियुक्ती एक वर्षे किंवा पे कमिशनचा कालावधी असेपर्यंत असणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या आशा आहेत. आयोगाची स्थापना ही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाली होती. या आयोगाकडे एकूण १८ महिन्याचा वेळ असून त्यांना या काळात रिपोर्ट तयार करून तो सरकारला सुपूर्द करायचा आहे. त्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.
आयोगाने देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन कर्मचारी संघटनांसोबत बैठका करत आहे. दिल्ली, लखनौ, उडिशा सारख्या शहरात बैठका झाल्या असून आगामी काळाज जयपूर, पदुचेरी सारख्या शहरात बैठका प्रस्तावित आहेत. या बैठकीद्वारे आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत आहे.
केंद्रीय कर्मचारी संघटनांनी यावेळी सर्वात जास्त जोर हा फिटमेंट फॅक्टरवर दिला असून काही संघटनांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टर असावा अशी मागणी केली आहे. फॅमिली युनिट देखील ३ वरून ५ करण्यात यावा ही मागणी जोर धरू लागली आहे. फिटमेंट फॅक्टरनुसारच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर अधिक ठेवण्याची मागणी आहे.