Eknath Shinde-Uddhav Thackeray file photo
राष्ट्रीय

Shiv Sena Crisis: सहा खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता

शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार रविवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृतरीत्या सहभागी होणार असल्याचे समजते.

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Crisis

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार रविवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृतरीत्या सहभागी होणार असल्याचे समजते. याबाबतची कारवाई पूर्ण होऊन रविवारी त्यांचा एकत्रितपणे फोटो आणि स्वाक्षरीचे कागद बाहेर येण्याची शक्यता आहे.

पक्षातून बाहेर पडून दोन तृतीयांश खासदारांचा गट म्हणून स्थापन होण्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्वीच पार पाडल्याचे समजते. याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार असल्याचे शिवसेना शिंदे गटातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचे शिवसेना शिंदे गटात विलीनीकरण झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या ७ वरून १३ वर जाणार आहे.

'ते' खासदार शब्द पाळणार !

शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांपैकी एक खासदार काही मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेणार का याकडे लक्ष आहे. मात्र राजकारणात कमिटमेंट महत्त्वाची असते आणि संबंधित खासदारांनी एकनाथ शिंदे यांना शब्द दिला आहे. तो शब्द ते पाळतील, असा मोठा दावा शिवसेना शिंदे गटाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी केला आहे. त्यामुळे रविवारी ते चर्चेतील खासदार कुठे दिसतील, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT