Earthquake In Kolkata:
कोलकात्यात आज सकाळी भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. आज सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.२ मॅग्निट्युटचा भूकंप आला होता. यामुळे बांगलादेशची राजधानी ढाका देखील थरथरली. आतापर्यंत तरी या भूकंपामुळं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा बांगलादेशमधील नरसिंगडी पासून १४ किलोमिटर असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोलकात्यातील रहिवासी आणि आसपासच्या भागातील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यांना फॅन आणि भिंतीवर लटकलेल्या वस्तू हलत असल्याचं जाणवलं. आतापर्यंत तरी या भूकंपामुळं कोणती जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
या भूकंपाचे धक्के हे कोलकाता पाठोपाठ आसपासच्या जिल्ह्यात आणि उत्तर बंगालमध्ये देखील जाणवले. कूचबिहार, दिनाजपूर या भागात देखील या भूकंपाचे जोरदार झटके अनुभवयास मिळाले.
यापूर्वी पाकिस्तानमध्ये देखील भूकंपाचे हलके धक्के बसले. सकाळी ३ वाजून ९ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ही ५.२ मॅग्निट्यूट इतकी होती. या भूकंपाचं केंद्र हे पाकिस्तानमध्ये जवळापस १३५ किलोमीटर आत होतं.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार गुरूवार आणि शुक्रवारी रात्री उशीरा हिंदी महासागरात देखील भूकंप आला होता. याची तीव्रता ४.३ इतकी होती. भूकंपाचे झटके हे अफगाणिस्तानमध्ये देखील जाणवले आहेत. त्याचा केंद्रबिंदू हा जमिनीच्या खाली १९० किलोमीटर आत होता. त्याची तीव्रता ४.२ मॅग्निट्यूट इतकी होती.