राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 : राज्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ पर्यंत २७.७८ टक्के मतदान

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज (दि.२०) मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी १ वाजेपर्यंत ३६.७३ टक्के मतदान झाले आहे, तर राज्यातील १३ मतदार संघात सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वा. पासून मतदान सूरु आहे.

राज्यांमधील मतदानाची टक्केवारी

बिहार – ३४.६२ टक्के
जम्मू आणि काश्मीर – ३४.७९ टक्के
झारखंड – ४१.८९ टक्के
लडाख – ५२.०२ टक्के
महाराष्ट्र – २७.७८ टक्के
ओडिशा – ३५.३१ टक्के
उत्तर प्रदेश – ३९.५५ टक्के
पश्चिम बंगाल – ४८.४१ टक्के

महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय टक्केवारी

धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या ४९ जागांसाठी एकूण ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५, झारखंडमधील ३, ओडिशातील ५ आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होत आहे.

राज्यात महामुंबईतील नऊ जागांसह १३ मतदारसंघांत होणार्‍या मतदानातून दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदार मतदान केंद्रावर येईल, यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT