Kapil Shot Dead In California :
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं एक धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी भारतीय वंशाच्या २६ वर्षाच्या तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे एक तरूण सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करत होता. त्याला या भारतीय वंशाच्या तरूणानं आक्षेप घेतला होता. कपिल असं या तरूणाचं नाव होतं. तो मुळचा हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवाशी होता.
या घटनेनंतर बाराह कालन गावचे सरपंच सुरेश कुमार गौतम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, 'कपिल हा कॅलिफोर्निया इथं सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. कपिल शनिवारी ड्युटीवर होता. त्यावेळी एका व्यक्तीने सार्वजनिक आवारात लघुशंका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कपिलने त्याला याबाबत विचारणा केली. या दोघांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर त्या व्यक्तीनं कपिलला गोळी घातली. कपिलचा जागीच मृत्यू झाला,
सरपंच सुरेश कुमार गौतम पुढे म्हणाले की, 'कपिल हा इश्वर यांचा एकुलता एक मुलगा होता. हे शतकरी कुटुंब आहे. तो अडीच वर्षापूर्वी अमेरिकेला गेला होता. २०२२ मध्ये तो डंकी रूटद्वारे अमेरिकेत पोहचला. त्यानं पनावाचं जंगल पार केलं होतं. त्यानंतर त्यानं मॅक्सिको बॉर्डर पार करून अमेरिकेत प्रवेश केला. यासाठी त्याच्या कुटुंबियांना जवळपास ४५ लाख रूपये खर्च आला होता. त्याला सुरूवातीला अटक देखील करण्यात आली होती. मात्र नंतर त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला होता.
दरम्यान, या घटनेनंतर कपिलच्या कुटुंबियांना कपिलचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कपिलला दोन बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीचं लग्न झालं आहे. सरपंच गौतम म्हणाले, 'संपूर्ण गाव या कुटुंबियाच्या पाठीशी उभं आहे. मात्र एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळं संपूर्ण कुटुंब दुखात आहे. कुटुंबीय हे डेप्युची कमिश्नरांची भेट घेऊन कपिलचा मृतदेह भारतात आणण्यात यावं अशी मागणी करणार आहेत. आम्हाला आशा आहे की सरकार यासाठी खंबीरपणे पाठीशी उभं राहील.