

सोलापूर : सात रस्ता येथील शिवसेना भवन येथे स्वागत कक्षासह अनाधिकृत व बेकायदेशीर उभे केलेल्या स्टेजला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही स्वागत कक्षासह स्टेज उभारण्यात आला. पोलिसांशी हुज्जत घातल्याने सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह सात जणांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सात रस्ता येथील शिवसेना भवन येथे स्वागत कक्षासह स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजला व स्वागत कमानीला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आले होते. तरीही जिल्हा प्रमुख काळजे यांनी या ठिकाणी स्वागत कक्षासह स्टेज उभारले. रस्त्यावरील वहातुकीला अडथळा होतो. म्हणून पोलिसांनी उभारलेले स्टेज व स्वागत कक्ष काढण्याचे आवाहन केले. तरीही त्यांनी ते काढले नाही. उलट पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. स्टेज काढणार नसल्याची ताठर भूमिकाही त्यांनी घेतले. तसेच. पोलिसांच्या आदेशाचे उल्लघंन केले. परिसरातील नागरिकांना फोन करून बोलावूनही घेतले. व, त्यांना चिथावणी देऊन सार्वजनिक रस्त्यावर बसून रस्त्यावरील वहातुकीला अडथळा केला. पोलिसांनी आवाहन करूनही स्टेजची उभारणी झाली.
पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. व त्यांच्याशी हुच्चत घातले. म्हणून, पोलिसांनी जिल्हा प्रमुख काळजे यांच्यासह सुमित मनसावले, वेणू श्रीनिवास, मुस्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोंगरे, जीवन नावाचा मंडप काँट्रॅक्टर यांच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.