प्रातिनिधिक छायाचित्र   (File Photo)
राष्ट्रीय

Delhi Sugar Factory Awards | दिल्लीत २५ साखर कारखान्यांना पुरस्कारांचे वितरण; महाराष्ट्रातील १० कारखान्यांचा समावेश

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

National Federation of Cooperative Sugar Factories

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे आज (दि.३) राजधानी दिल्ली येथे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

१०३ सहकारी साखर कारखान्यांपैकी २५ साखर कारखान्यांना आज पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १० साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रनंतर तमिळनाडूला ५, उत्तरप्रदेशला ४, गुजरातला ३, तर पंजाब, हरियाणा, आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी एका कारखान्याला पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देण्यात येणारा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार' हा पुण्यातील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास (दत्तात्रेय नगर, ता. आंबेगाव) देण्यात आला आहे.

विविध विभागनिहाय पुरस्कार पुढील प्रमाणे

उत्कृष्ट ऊस उत्पादकता गट

प्रथम : विघ्नहर सहकारी साखर कारखाना (शिरोली, निवृत्तीनगर, ता.जुन्नर)

द्वितीय : क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना

तृतीय : श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग (सुरत, गुजरात)

तांत्रिक क्षमता गट

प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड, जि.सातारा)

द्वितीय : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर, सोलापूर)

तृतीय : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना ( वांगी, जि. सांगली)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार

प्रथम : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना ( जालना)

द्वितीय : श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी (पांडवाई, गुजरात)

तृतीय : श्री. नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी (नांदोड, नर्मदा, गुजरात)

विक्रमी ऊस गाळप विभाग

प्रथम : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (माढा, सोलापूर)

प्रथम : कुंभी कासारी सहकारी साखर काखाना (कोल्हापूर)

उच्च साखर उतारा अत्युत्कृष्ट साखर कारखाना

श्री. सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना (बारामती, जि.पुणे)

 उत्कृष्ट ऊस उत्पादकता

प्रथम : बुधेवाल सहकारी शुगर मिल्स (लुधीयाना पंजाब)

द्वितीय : कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर (विल्लुपुरम, तामिळनाडू)

तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (पोवांय, उत्तरप्रदेश)

तांत्रिक कार्यक्षमता

प्रथम : करनाल सहकारी साखर कारखाना (करनाल, हरियाणा)

द्वितीय : चेय्यार सहकारी साखर कारखाना (अंकापूर,तामिळनाडू)

तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (आझमगढ, उत्तरप्रदेश)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन

प्रथम -:नवलसिंह सहकारी साखर कारखाना (नवलनगर, बर्हाणपूर, मध्यप्रदेश)

द्वितीय : चेंगलरायन सहकारी साखर कारखाना (थिरूवैनैनाल्लूर, तामिळनाडू)

तृतीय : धर्मापूरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना (थैमानहळ्ली, धर्मापूरी, तामिळनाडू)

विक्रमी ऊस गाळप

प्रथम : रमाला सहकारी साखर कारखाना (रमाला बरूत, जि. बागपत, उत्तरप्रदेश)

विक्रमी साखर उतारा

प्रथम : किसान सहकारी साखर कारखाना (गजरौला, जि.अमरोहा, बागपत, उत्तरप्रदेश)

उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना (गोपालापूरम, धर्मापूरी, तामिळनाडू)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT