राष्ट्रीय

छत्तीसगडमध्‍ये चकमकीत दोन नक्षलींचा खात्‍मा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील जप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात झालेल्‍या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. या परिसरात शोध मोहिम सुरु असल्‍याचे बिजापूर पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

जप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्‍ये दोन नक्षली ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्रे, वायरलेस सेट, स्टूज, माओवादी गणवेश, औषधे, प्रतिबंधित माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य, साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या परिसरात शोध मोहिम सूरु आहे, अशी माहिती विजापूर पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT