Dhavya Shah AI Start Up Supermemory:
मुळचा मुंबईचा १९ वर्षाचा युवा उद्योजग ध्रव्य शहा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. AI च्या जगतात त्यानं मोठा धमाका केला असून त्याच्या स्टार्टअपनं तब्बल २३ कोटी रूपयांचं फंडिग मिळवलं आहे. त्याच्या AI स्टार्टअपचं नाव आहे सुपरमेमरी! विशेष म्हणजे या स्टार्टअपमध्ये गुगल AI चे प्रमुख जेफ डीन यांनी देखील गुंतवणूक केली आहे. तसंच डीपमाईंडचे प्रोडक्ट मॅनेजर लोगन किलपॅट्रिक, ओपन AI, मेटा आणि गुगल सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमधील मोठ्या लोकांनी देखील १९ वर्षाच्या ध्रव्य शहा याच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
19 वर्षाच्या सुपरमेमरीचा फाऊंडर हा मुंबईचा असून तो अवघ्या १९ वर्षाचा आहे. तो आपल्या किशोरवयापासूनच कंज्युमर फोकस बॉट्स आणि अॅप तयार करत होता. ज्यावेळी त्यानं आपला पहिला बॉट विकला त्यावेळी तो प्रकाशझोतात आला. हा बॉट ट्विट्सचे रूपांतर आकर्षक स्क्रीनशॉट्समध्ये करत होता. हा बॉट त्यानं सोशल मीडिया टूल हायपरफ्युरीला विकला होता.
ध्रव्य मुळात आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी तर होता. त्यानंतर तो अमेरिकेत जाऊन अरिझोना विद्यापीठात शिकण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्यानं आता सुपरमेमरी स्टार्टअपवर फोकस केला.
ध्रव्य शहा हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील पोरगा आहे. गेल्या वर्षी यूट्यूब व्हिडिओत त्यानं आपल्या पालकांना कोरोना काळात लॅपटॉप घेऊन देण्यासाठी कसं मनवलं हे सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'मुंबईतील मध्यम वर्गीय कुटुंबातील असल्यामुळं माझे पालक मला लॅपटॉप घेऊन देण्यासाठी तयार नव्हते. अखेर त्यांनी मला माझा लॅपटॉप घेऊन दिला.
त्यानंतर ध्रव्य कोडिंग शकला. त्यानं एक बॉट तयार केला अन् हायपरफ्युरीला विकला सुद्धा... त्यानंतर तो AI क्षेत्रातील आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेला. त्याच्या ट्विटर हँडलवरून तो सध्या अमेरिकेत असून तो ०-१ व्हिसावर अमेरिकेत गेल्याचं समजतं.
ध्रव्यनं अमेरिका गाठल्यानंतर त्यानं ४० आठवड्यापैकी प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं होतं. पहिल्या आठवड्यात त्यानं सुपरमेमरीचं सुरूवातीचं व्हिजन तयार केलं. त्याला त्यानं Any Context असं नाव दिलं होतं. याद्वारे युजर्स त्यांच्या ट्विटर बूकमार्कसोबत चॅट करू शकत होते.
त्यानंतर सुपरममेमरी विकसीत होत गेलं. आता त्यानं अशी पॉवरफुल सिस्टम तयार केली आङे जी मेमरी किंवा अनस्ट्रक्चर्ड डाटामधून इनसाईट्स एक्स्ट्रॅक्ट करते. डॉक्युमेंट, चॅट, प्रोजेक्टट्स आणि इमेलमधून हे सुपमरमेमरी माहिती गोळा करतं. याद्वारे माहितीच्यामागील संदर्भ समजण्यास मदत होते.
सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ध्रव्यनं AI ला तो काय शिकला हे लक्षात ठेवण्याची आणि नंतर त्या ज्ञानाचा वापर कसा करण्याची क्षमता विकसीत केली आहे. ध्रव्यनं सांगितल्याप्रमाणं त्याचा स्टार्टअप हा मल्टीमोडल डाटावर काम करतो. आम्ही सर्व प्रकारच्या AI अॅप्सना युजरबाबतच्या अनस्ट्रक्चर डाटामधून इनसाईट्स काढून देण्याचं मुख्य काम करतो.
टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार सुपरमेमरीनं जवळपास २.६ मिलियन म्हणजे २३ कोटी पेक्षा जास्त फंडिंग मिळवलं आहे. यामध्ये सुसा व्हेंचर्स, ब्रॉव्हडर कॅपिटल्स आणि एसएफ१ या गुंतवणूक कंपन्यांचा समावेश आहे. तसंच क्लाऊडफेअरचे क्नेचट, जेफ डेन, लोगन किलपॅट्रिक आणि सेंट्री फाऊंडर डेव्हिड क्रेमर यांनी देखील सुपरमेमरीमध्ये गुंतवणूक केली आहे.
सुपरमेमरीचे क्लुली, AI व्हिडिओ एडिटर माँट्रा आणि रिअल इस्टेट स्टार्ट्सप रेट्स हे ग्राहक आहेत.