पूर नियंत्रण आणि जलसिंचन  योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
पूर नियंत्रण आणि जलसिंचन योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद 
राष्ट्रीय

Budget 2024 : पूर नियंत्रणासह जलसिंचन प्रकल्पासाठी 11,500 कोटी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पूर नियंत्रण आणि जलसिंचन योजनांसाठी 11,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नमामी गंगा योजनेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. गंगा नदीच्या विकासासाठी 3,345 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अटल भूजल योजनेसाठीच्या निधीमध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि नदी संवर्धन प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जलस्रोत, नद्यांच्या विकासासाठी 30,233 कोटी

जलस्रोत, नद्यांचा विकास आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 30,233 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यावेळी यासाठी 55 टक्क्यांनी अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जलसिंचन आणि पाणीपुरवठा योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT