राष्ट्रीय

Rashtriya Bal Puraskar : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने ११ मुलांचा होणार सन्मान

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील ११ मुलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३ (Rashtriya Bal Puraskar)  सोमवारी (दि.२३)  प्रदान करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी देखील मुलांशी संवाद साधतील आणि महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन (Rashtriya Bal Puraskar)  करतील, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पुरस्कार विजेत्यांमध्ये ६ मुले आणि ५ मुली आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या प्रत्येक विजेत्याला पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील ११ बालकांना यंदा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

खालील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांना मिळणार पुरस्कार

कला आणि संस्कृती – ४ मुले
धैर्य – १
नवीनता – २ मुले
समाजसेवा – १
क्रीडा – ३ मुले

केंद्र सरकारच्या वतीने मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, सामाजिक सेवा आणि क्रीडा यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT