ईडीविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे आंदोलन(छाया-हेमंत घोरपडे) 
Latest

संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाईन

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्रभरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, नाशिकमध्येही संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. (आज दि. 1) नाशिकमधील शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालयासमोर ईडीविरोधात निदर्शने केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, वसंंत गीते, विलास शिंदे, शोभा मगर, दत्ता गायकवाड, योगेश घोलप, योगेश बेलदार, सचिन मांडे, उमेश चव्हाण, यशवंत निकुळे, शोभा गटकळ, नयना घोलप, नयना गांगुर्डे, दादाजी आहेर, शालिनी दीक्षीत, मंजुषा दराडे आदींसह शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडीनेही या आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी बाळासाहेब, उद्धव साहेब यांचा शिवसैनिक ईडीला घाबरला नाही, अटक व्हायलाही घाबरला नाही. शिवसेना आयुष्यात सोडणार नाही अशा आशयाचे फलक हाती घेऊन शैवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडीचा वापर करुन शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शिवसैनिकांनी केला. कितीही संकटे आली तरी शिवसेना हटणार नाही. संजय राऊत यांच्यापाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे शिवसेना पदाधिका-यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT