Latest

Nashik Shinde Gat : महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटाचे ‘मिशन ४८’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) ही आक्रमक झाला असून, मार्चमध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 'मिशन ४८' हाती घेण्यात आले आहे. शिंदे गटाचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बुधवारी (दि. ६) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आगामी निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. (Nashik Shinde Gat)

याप्रसंगी शिंदे गटाचे नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महिला आघाडी जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, महानगर संघटक अस्मिता देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, देवळाली, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघांतील पक्ष संघटनात्मक आढावा घेतला. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी तसेच बूथप्रमुखांच्या नेमणुकांविषयी माहिती घेताना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलेली जनहिताची कामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन चौधरी यांनी यावेळी केले. (Nashik Shinde Gat)

संपर्कप्रमुख, निरीक्षकांचा सत्कार

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी, तर नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे यांची नाशिक लोकसभा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शहर-जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू (Nashik Shinde Gat)

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून, प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अर्ज भरून देणे किंवा ७७०३०७७०३० या मोबाइल क्रमांकावर मिसकॉल देऊन येणाऱ्या लिंकवरील फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व घेणे किंवा क्यूआर कोड स्कॅन करून फॉर्म भरून त्यानंतर ओळखपत्र डाउनलोड करून सदस्यत्व घेणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंदे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शालिमार येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ग्रामीण लोकसभा निरीक्षक सुनील पाटील, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT