अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे 
Latest

नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल

अंजली राऊत

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा – अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला असुन मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून जाळून हत्या केली होती. या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे यांचा पूर्वीच मृत्यू झाला. तर यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उरलेल्या तिघा आरोपींना 302 सह विविध कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हात्यकांडचा गुरुवारी, दि.8 तब्बल अकरा वर्षांनंतर निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तीन आरोपींना याप्रकरणी जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मच्छिन्द्र सुरवडकर, राजू शिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम 302 अंतर्गत आजीवन करावास (जन्मठेप), 7 वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड सुनावला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 25 जानेवारी 2011रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाड पासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी सोनवणे हे गेले असता इंधन माफियांनी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिन्द्र सुरवडकर, राजू सिरसाट, अजय सोनवणे आणि एक अल्पवयीन असे पाच आरोपी होते. त्यापैकी पोपट शिंदे यांचा त्यावेळी मृत्यू झाला तर एक आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायलयात खटला सुरु होता.

मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू होते. सरकारतर्फे सीबीआय वकील ॲड. मनोज चालधन, ॲड. अभिनवकृष्णा यांनी तर आरोपीच्या वतीने नाशिक येथील ॲड. राहुल कासलीवाल यांच्या आतंर्गत ॲड. अच्युत निकम व मनमाड येथील ऍड सागर गरुड यांनी कामकाज पाहिले.

शिक्षेची सुनावणी होताच आरोपी न्यायालयातच कोसळला…!
या घटनेतील आरोपी हे जामिनावर होते आज सुनावणी दरम्यान ते मालेगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते.न्यायाधीश डी वाय गोंड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली शिक्षा ऐकताच आरोपी नंबर दोन मच्छीन्द्र सुरवडकर याला छातीत दुखायला लागले व तो तेथेच कोसळला त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT