नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिंदे गावातील एमडी ड्रग्स प्रकारणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे नार्कोटेस्ट विभागाचे पथक रविवारी (दि. १५) सकाळी शिंदे गावात दाखल झाले. संशयीत आरोपी भुषण पाटील याच्यासोबत पथकाने गावात विविध ठिकाणी पाहणी केली. या प्रकरणात पोलीस आता कमालीचे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
संबधित बातम्या :
नार्कोटेस्ट विभागाच्या पथकाचे पोलीस निरीक्षक थोपटे यांच्यासह महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शिंदे गावात पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिजीत बलकवडे चालवत असलेल्या एमडी ड्रग्स कारखान्याची अतिशय बारकाईने तपासणी केली. पोलिसांनी भूषण पाटील याच्याकडून तपासासाठी आवश्यक आणि उपायुक्त माहिती संकलित केली. भूषण पाटील याच्यावर पुणे पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केला. एमडी ड्रग्ससाठी लागणारा कच्चामाल कुठून येत होता, त्यासाठी कोण मदत करत होते, कच्चामाल आल्यानंतर एमडी ड्रग्स कसे बनवले जात होते, या कामात कोण मदत करत होते आदींबाबत माहिती गोळा केली. तसेच पाटीलला जागा देणाऱ्या मालकाचीही चौकशी पुणे पोलिसांनी केली. भूषण पाटील याने एमडी कारखान्यात दोन कामगार ठेवले होते. त्यातील यादव नावाचा एक व्यक्ती त्याला मदतनीस म्हणून कार्यरत होता, अशी माहिती तपासात उघड झाले आहे. (Nashik Drug case)
अभिजित बलकवडे पुरवठादार
शिंदे कारखान्यात तयार झालेला माल मुंबईसह महाराष्ट्रात अन्यत्र अभिजीत बलकवडे पोहचवत असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात अत्यंत गोपनीयता
पुणे पोलीस पथकाने शिंदे गावात तपास करीत असताना अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांना आवश्यक असलेली माहिती संकलित केली. काही स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करुन इतरही माहिती गोळा केली. त्यामध्ये पोलिसांना तपास कामासाठी आवश्यक असणारी माहिती मिळाल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. तपासात अत्यंत गोपनीयता पाळली गेली. प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलण्यास पोलिसांनी स्पष्टपणे नकार दर्शविला. पथकातील तपास अधिकाऱ्यांच्या नावाविषयी देखील कमालीची गोपनीयता पाळण्यात आली.
निवास्थानी देखील तपासणी
पुणे पोलिसांनी भूषण पाटील वास्तव्यास असलेल्या उपनगर परिसरातील त्याच्या निवासस्थानी देखील तपासणी केली. सोबत भूषण पाटील देखील होता. निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलिसांनी नेमकी काय चौकशी केली, याविषयी माहिती समजू शकली. नाही मात्र पोलिसांना आवश्यक ती माहिती मिळाली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :