Latest

Nashik Crime : न्यायडोंगरी पुन्हा हादरलं, दगडाने ठेचून एकाची हत्या

गणेश सोनवणे

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खुनाचे सत्र थांबता थांबेना, एका महिन्यातच पुन्हा तिसऱ्या खुनाची घटना समोर आल्याने न्यायडोंगरी गाव हादरून गेले आहे. येथे मागील काही दिवसांपूर्वी मुलाच्या मदतीने पत्नीने दारुड्या पतीला संपवले, डॉक्टर पतीने वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले या दोन घटना ताज्या असतानाच आज न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे. (Nashik Crime)

न्याडोंगरी ते परधाडी रोडच्या कडेला शेताजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मयताची ओळख पटवून या व्यक्तीचा खून कोणी केला व का केला याचा तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड येथील उप विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, नांदगांव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या ताफ्यासह घटना स्थळाला भेट देऊन तपासाचे दृष्टीने आवश्यक त्या हलचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT