पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' मधून नावारूपाला आलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी ( Nargis Fakhri ) नंतरच्या काळात कमीच चित्रपटांत दिसली. तिची चर्चा झाली ती उदय चोप्रासोबतच्या अफेयरमुळे. पाच वर्षे हे कपल रिलेशनमध्ये होते. आता नर्गिसचे नाव एका काश्मिरी उद्योगपतीशी जोडले जात आहे. 42 वर्षीय नर्गिसच्या या नव्या बॉयफ्रेंडचे नाव आहे टोनी बेग. दोघेही एकमेकांसोबत सध्या क्वालिटी टाईम अनुभवत आहेत. अनेक ठिकाणी हे कपल एकत्र दिसून येत आहे.
तशी नर्गिस ( Nargis Fakhri ) बिनधास्त आहे. पण, हे नाते नवे असल्याने ती सध्या हे लपवूनच ठेवायचा प्रयत्न करत आहे. तीने अधिकृतरित्या याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही. यापूर्वी उदय चोप्रासोबतच्या रिलेशनला तिने खुलेआम स्विकारले होते. तसेच ब्रेकअपचीही माहिती दिली होती. तसेच उदयनेच लोकांपासून हे रिलेशन लपवून ठेवण्यास सांगितले होते. पण आमचे नाते इतके सुंदर होते की पर्वतावर उभे राहून ओरडून सांगावे, असे वाटायचे, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हटली होती. उदयसोबत ब्रेकअपनंतर नर्गिस पुन्हा अमेरिकेला निघून गेली. सध्याही ती अमेरिकतच आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) सध्या टोनी बेग या काश्मिरी उद्योगपतीला डेट करत आहे. सध्या ते एकमेकांना सतत भेटत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा ते एकत्र भेटताना नजरेस पडत आहेत. पण फक्त नर्गित इतक्यात या नात्याला सर्वांसमोर आणू इच्छित नाही. ४२ वर्षांच्या टोनी बेगने सुद्धा नर्गिसमध्ये चांगलाच गुंतल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोघे सध्या एकमेकांच्या सुमधुरनात्यामध्ये गुंतल्याचे दिसत आहेत.
नर्गिस फाखरी हिने उदय चोप्रा सोबतच्या नात्याचा खुलेआम स्विकार केला होता. तरी या आधी दुसऱ्या एका बाय फ्रेंड सोबत तिने आपल्या इटली येथील ट्रीपचे फोटो देखिल तिने शेअर केले होते. जस्टीन सॅनटॉस ( Justin Santos ) या बॉयफ्रेंडसोबत ती इटलीला गेली होती. दोघांनी ही इटली ट्रीप इन्जॉय केली होती. आता नर्गिस पुन्हा टॉनी बेग नावाच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे.
नर्गिस तशी बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू शकली नाही. २०११ साली रणबीर कपूर सोबत रॉकस्टार या सिनेमातून तीने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. यानंतर तीने ' मद्रास कॅफे', ' मै तेरा हिरो', 'अजहर', 'तोरबाज' या चित्रपटामध्ये तीने काम केले आहे.